शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म ही मनाशी जोडलेली अतूट शक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:19 IST

‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे.

भौतिक गोष्टींचा विसर पडत फक्त ईश्वराचे गुणवर्णन व्यक्तीच्या मुख आणि मनाने सुरू असणे, हीच खरी श्रद्धा होय. श्रद्धेच्या वाटेवर जो आला तो कधीही परत फिरत नाही. एकदा त्याला श्रद्धेची अनुभूती आली की, मग त्याचा पुढचा प्रवास अयोग्य होऊ शकत नाही. अध्यात्म ही अशी मनाशी जोडलेली शक्ती आहे. आपल्या सर्व संतमंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते याच विद्येच्या जोरावर सांगितले आहे. ‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतांनी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते. मनाच्या डोहात कायमच ढवळाढवळ सुरू असते. तिथे वासना चेतविल्या जातात. त्यामुळे अशा ठिकाणी वैराग्याचा दीप लावणे म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टींपासून अलिप्त राहणे होय. ही अलिप्त राहण्याची किमया उत्कट भावनेने स्वीकारता आली पाहिजे.  वासना उडवता आली पाहिजे. ज्या देहाच्या ठिकाणी अशी वासना उडवली जाते तिथेच वैराग्य नांदते. देवावर माझी श्रद्धा आहे, असे म्हणणे म्हणजे श्रद्धा नसून श्रद्धेचा धागा हा कायम त्याग आणि समर्पण भाव यांच्याशी जोडलेला असतो.  ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. त्याचा रोजच्या जगण्याशी संबंध आणता येतो का? हे जास्त मोलाचे.  तीच तृप्तता मला अध्यात्मचा नवा धडा देणारी असेल. - वेदांताचार्य राधे राधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि. बुलडाणा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक