शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

‘‘विनम्रता’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 20:34 IST

मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले. ‘‘आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का?’’ चॅप्लीनन उत्तर दिल कि त्याच घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे?

-दत्ता कोहिनकर

सकाळच्या रम्य प्रहरी केंद्रात फिरत असताना आचार्य सत्यनारायण गोएंकाजींचा एक दोहा कानावर पडला, 

जिसके मन मे प्रज्ञा जगी- होय विनम्र‘ विनित। 

 जिस डाली को फल लगे-  झुकने कि ही रीत॥

मला महात्मा गांधीची आठवण झाली. एकदा गांधीजी-चार्ली चॅप्लीनला भेटण्यासाठी त्यांच्या छोट्या घरी गेले. भेटून झाल्यावर गांधीजींनी चॅप्नीलला विचारले. ‘‘आमच्या प्रार्थनेची एक झलक तुम्हाला पहायची आहे का?’’ चॅप्लीनन उत्तर दिल कि त्याच घर खूपच लहान असून प्रार्थना करणार कोठे? गांधीजी म्हणाले तुम्ही सोफ्यावर बसा, आम्ही खाली बसून प्रार्थना करू. त्याचप्रमाणे त्यांनी केल सुद्धा. पुढे चॅप्लीनन लिहलय, गांधीजी व त्यांच्या साथीदारांना माझ्या पुढेच जमिनीवर बसण्याची लाज बिलकुल वाटली नाही पण मी मात्र त्यांच्यापुढे वर सोफ्यावर बसून खाली पाहताना खजिल झालो होतो. खरोखर मित्रांनो आयुष्यात महत्त्कार्य करताना विनम्र‘ता या गुणाचा विकास करावा लागतो. अहंकाराचा त्याग करावा लागतो. सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. मृत्यूपत्राच्या माध्यमातून सिकंदरने आपल्या सर्वांना एक संदेश दिला होता, ‘‘मी सिंकदर मी जग जिंकले पण खाली हाताने आलो होतो आणि खाली हातानेच परत चाललोय.’’ म्हणून कितीही पैसा, प्रतिष्ठा, सत्ता मिळवली तरी वृथा अभिमान बाळगु नका, नेहमी नम्र रहा. 

‘‘म्हणतात ना महापुरे झाडे जाती-तेथे लव्हाळे वाचती’’ महापुराच्या विरोधात उभे राहणारे वृक्ष उन्मळून पडतात. याउलट नदीपत्रातील लव्हाळ्याची पाती सकाळच्या वेळी सुर्यकिरणांनी न्हाऊन निघतात. विनयशीलतेचे महिमान सांगताना बसवेश्‍वर विचरतात. गाय आपल्या पाठीवर बसणार्‍यांना कधी दूध देईल का? ज्याला दुध हवे त्याने गाईच्या पायाशी बसावयास शिकले पाहिजे.

बहिणाबाई चौधरीच्या काही स्फुट ओव्या आहेत. एका ओवीत बाभळीचे पान केळीच्या पानाशी बोलते. 

फाट आता टराटरा-नाही दया तुफानाला ।

हाले बाभळीचे पान - बोले केळीच्या पानाला ॥

बाभळीचे पान तसे अगदी लहान, केळीचे पान तुलनेने महान सोसायट्याच्या वाराला केळीचे पान अडवू पाहते व आपला उर फोडून घेते. बाभळीचे पान वार्‍याला कौतुकाने कुरवाळते त्यामुळे वारा त्या लहानग्याला खांद्यावर घेऊन नाचतो. संत तुकाराम महाराज पण म्हणतात ना - लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा । 

हे लहानपण म्हणजे आपले अवमुल्यन नव्हे - तर हे असते सभ्यतेचे सार. सभ्यतेमुळे माणूस संयमी व शांत होतो तो नम्र‘ होतो. विद्या विनयेत शोभते. खरोखर निसर्गाला नम‘तेचे आसन आवडते. नम्र‘ माणसाच्या मागे सगळ्या शुभशक्ती उभ्या राहतात. परंतु आधुनिक युगात बर्‍याचदा सद्गुणी माणसाला लोक त्रास देतात. त्यावेळी सद्गुणांची विकृती न होता तुम्हाला जशाच तसे उत्तर देता आले पाहिजे. मेणाहून मऊ असणारे विष्णुदास प्रसंगी वज्राहून कठोर होत असतात असे तुकाराम महाराजाच्या अभंगात वाचावयास मिळते. त्यामुळे वेळप्रसंगी वज्रासारखे कठोरपण व्हा पण अंर्तमनात प्रचंड मंगलमैत्री असू द्या व विनम्रता म्हणजे लाचारी किंवा दुर्बलता नसून निष्कपट, निष्कलंक, निरागस‘ही सरलता, मनाची शुद्धता आहे ही विनम्रता आचरणात आणण्यासाठी मनाला ध्यानाची जोड द्या.

दहा दिवसाचे विपश्यना ध्यान शिबिर करा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक