शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक : मोले घातले रडाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 03:00 IST

मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस

मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच; परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर, कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून अशा एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर जर एखाद्या सहृदयीच्या वतीने दोन-चार लोकांना पाच-पन्नास रुपये दिले तर ते गेलेल्या व्यक्तीविषयी किती रडणार? ज्या व्यक्तीविषयी ज्यांच्या मनात माया व संवेदना नाही, त्या व्यक्तीसाठी भाडोत्री रडणारे त्याच्या गुणकर्माला आठवून रडत नाहीत तर केवळ पाच-पन्नास रुपयांच्या मजुरीपुरते रडतात. ज्याचा संबंध आंतरिक भाव-भक्तीचा प्रेममय जिव्हाळा व कोरडा भाडोत्रीपणा यांच्याशी जोडताना संत तुकोबाराय म्हणतात,

मोले घातले रडाया, नाही आसू अन् मायातैसा भक्तिवाद काय, रंग बेगडीचा न्याय।वेठी धरल्या दावी भाव, मागे पळावयाचा पाव ।काजव्याच्या ज्योती, तुका म्हणे न जगे वाती ।

भक्तीच्या क्षेत्रात धूप, दीप, नैवेद्याचा सुकाळ दीपांची आरास व राजस सोहळ्याची बेगडी प्रवृत्ती असली तर त्या भक्ताची अवस्था मोलाने रडणाऱ्या संवेदनहीन माणसासारखी होते. तो हसतोही खोटे आणि बोलतोही खोटे. पण या खोट्यांच्या कपाळी गोटा मारण्याऐवजी त्यांच्याच भोवती अज्ञानी भक्तांची भाऊगर्दी होते. कधी नामगर्जनेच्या रूपाने, कधी प्रेमानंदाच्या उन्मादाने आज अनेक नवे कृष्णावतार आणि राधेमाँ निर्माण होत आहेत. अंतरंगात भावभक्तीचा फुलोरा फुलला पाहिजे तरच सत्य, ज्ञानानंद ईश्वरी ज्ञानाचा दिवा मन नावाच्या मंदिरात पेटतो. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक