शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संतांचे मन स्वच्छ झऱ्यासारखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 08:38 IST

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही. संत ईश्वराच्या आत्मसाक्षात्काराने भारावून गेलेले असतात. त्यांची जीवदशा बदलेली असते. ते मनाने सतत हरिचिंतनातच रत असतात. हरिनामाची आवड त्यांच्या मनात आहे ते प्रत्यक्षात ईश्वराचे रूपडे आहेत. त्यांच्याविषयी इतरांना ते कळत नाही. त्यासाठी संताचीच अनुभूती घ्यावी लागते. संताचे मन नितळ-स्वच्छ झऱ्यासारखे असते. ते कोणत्याही मोहात अडकत नाही. वर्तमान स्थितीत जगतात. जगत कल्याणाच्या कल्पना करतात. ते कशाचीही आशा न धरता सर्वस्व टाकून ईश्वराला शरण जातात. ते वर -वर आपल्यासारखे दिसतात; पण ते प्रत्यक्षात तसे नसतात.

त्यांचे मन ईश्वरातीत झालेले असते. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप निवारण करतात. व्यवहारात त्यांना अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती आली तरी ते समत्व ठेवतात. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे ईश्वरतत्त्व त्यांच्या हाती असते.देव भक्तांचा अंकित असतो. संत झाल्याशिवाय संताचा महिमा कळत नाही. संत हे दीपस्तंभासारखे असतात. समाजाची नैतिकता, समाजाचे स्थैर्य टिकविण्यासाठी संताचा जन्म असतो. ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे’ ही संताची मनोवृत्ती असते. जगत कल्याण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. संताचे मन अथांग सागरासारखे विशाल असते. त्यांच्या कृपादृष्टीने माणूसपण येते. माणसाच्या आंतरिक वृत्तीत बदल होतो. ‘संतकृपा झाली इमारत फळा आली’ अशी संतवचने आहेत.

आपल्या मनात शंका-कुशंकाच येतात. संत त्या दूर करत मनाला सद्वृत्तीकडे परावृत्त करतात. मनाची अवस्था बदलून टाकतात. संतकृपेमुळे जीवनात स्थिरता येते. व्यावहारिक उन्नतीपासून आत्मिक उन्नतीचा मार्ग सुकर होतो. संतविचार मनुष्य जीवनात बदल घडवतात. धैर्यशील बनवतात. संतांची वचने सुमधुर, रसाळ व मृदू असतात. संताच्या विचारांचा मनावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे मनुष्यदेहाचे महत्त्व समजते. संसाराविषयी वीट येतो. ज्याच्यापासून हित आहे त्याची गोडी लागते. मन परिपक्व होते. म्हणून संताची कृपा मनुष्याला समाधान प्राप्त करून देतात. संताचे मन गंगेसारखे पावन असते.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक