शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आहारावर अवलंबून असते विचारांची गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 08:44 IST

सात्त्विक आहारामुळे प्रसन्न राहाते. प्रसन्नता आणण्यासाठी आहारावर नियंत्रण आवश्यक असते.

कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना विचारपूर्वक करा, कारण काही पदार्थ सेवन करण्यासारखे नसतात. जो सात्त्विक पदार्थाचे सेवन करतो. तो स्वास्थ्यपूर्ण जीवन जगतो. विचारांची गती आपल्या खाद्यपदार्थांवर अवलंबून असते. जसा आपण आहार घेतो त्यानुसार आपली वैचारिक पातळी ठरते. शुद्ध अन्न मनाला सात्त्विकता प्रदान करते. सात्त्विक मन शांतीला जन्म देते. सात्त्विक आहार, तामसी आहार, राजस आहार असे आहाराचे प्रकार असतात. तामसी आहारामुळे व्यक्ती क्रोधिष्ट होते. राजस आहारामुळे मौलिक होते.

सात्त्विक आहारामुळे प्रसन्न राहाते. प्रसन्नता आणण्यासाठी आहारावर नियंत्रण आवश्यक असते. आपण जसा आहार सेवन करतो तशी बुद्धी होते. जशी बुद्धी तसे विचार; त्यानुसार त्याच्या ज्ञानाची वृद्धी होते. कारण प्रत्येक मनुष्य जो काही बोलतो तो आपल्या बुद्धीनुसार. बुद्धी-विचार-मन-भावना या सगळ्यांवर आहाराचा परिणाम होतो. ज्याचे जसे विचार तसे त्याचे संकल्प असतात. ज्ञानी मनुष्य आपल्या मुखातून निरर्थक बोलत नाही. त्याच्या वचनाला फार मोठा अर्थ असतो. त्याच्या प्रज्ञानरूपी बुद्धीचे चिंतनाचा प्रभाव त्याच्या प्रकाशमयी जीवनावर होतो. त्याची वाणी ब्रह्म आणि वेदाचे, सत्य आणि धर्माचे तत्त्व आणि बोधाचे निवरण करते.

जीवनात सुख आणि शांतीचा विचार येण्यासाठीसुद्धा आहार महत्त्वाचा आहे. सात्त्विक अन्नाचे सेवन केल्यास सुभावना निर्माण होते. सुभावना मनाला चांगला कार्यासाठी उत्तेजित करते. जगाला चांगला संदेश त्या वैचारिकतेतून मिळतो. सात्त्विक विचारांनी माणूस उन्नतीच्या उच्चतम शिखरावर चढून जातो. जीवनाच्या राजमार्गावर चालतो. शत्रुता-कटुता याचा तो विचार करत नाही. आपल्या विचारांवर अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. त्यानुसार समाजात संबंध जुळून येतात. म्हणून सात्त्विक आहार घ्या. सात्त्विक आहारातून आपल्या वागण्या-बोलण्यात बदल घडेल. आपल्याकडून समाजहित जोपासले जाईल. विचारांच्या माध्यमातून सुव्यवस्था निर्माण केली जाईल. या सर्व गोष्टींसाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता आहे.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :foodअन्न