शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पापातलं पुण्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:59 IST

पाप म्हणजे दु:ख व पुण्य म्हणजे सुख अशा पापपुण्याच्या व्याख्या आहेत.

- बा.भो. शास्त्रीपाप म्हणजे दु:ख व पुण्य म्हणजे सुख अशा पापपुण्याच्या व्याख्या आहेत. महर्षी व्यासांनी महाभारतात म्हटलं आहे, ‘‘अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचन द्वयम् परोपकार पुण्यात पापाय परपिडणम्’’ इष्ट हे पुण्य व अनिष्ट हे पाप याचे अर्थ ठाऊक असून श्री चक्रधर म्हणतात, ‘अल्पे आनिष्टे बहुत अनिष्ट परिहरे तर परिहारिजे’ थोड्या वाईटाने जास्त वाईट नष्ट होत असेल तर तसं वाईट करायला हरकत नाही, असा सूत्राचा सरळ अर्थ आहे. ज्याला ही दृष्टी प्राप्त झाली त्यालाच गीता बुद्धिमान म्हणते.‘‘कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्मय: स बुद्धिमान्मनुष्येषु सयुक्त: कृत्स्रकर्मकृत्’’ हीच नजर स्वामी मराठीतून आपल्याला देतात व थोडं अनिष्ट करण्याची फुल परवानगी देतात. आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो. आपल्याला वाटेल, ही पापप्रवृत्तीला उघड उघड प्रेरणाच आहे. श्रावणाच्या बापाने दशरथाला दिलेल्या शापात शापच नाही, वरही आहे. मरतेवेळी एकही मुलगा जवळ राहणार नाही. हाच तो दु:खातला आनंंद रडताना हसवतो. राजा बाप होणार हे पुत्रप्राप्तीचं सुख त्याचं मरणही सुखाचंंं करतं. असंं इष्ट करणारंं अनिष्ट पण इष्टच असतंं, हाच सूत्राचा आत्मा आहे. एका मुलाचं बापावर खूप प्रेम आहे. बापाच्या बोटाच्या नखाजवळ जखम झाली, डॉक्टर म्हणतो, गँगरिन आहे. एक कांंड तोडावं लागतं. मुलगा म्हणाला, दहा दिवसांनी येतो, तर डॉक्टर म्हणतो, मनगट तोडावंं लागेल. महिन्यानंंतर खुब्यापासून हात तोडावा लागेल आणि वर्षानंतर यांच्या अंत्यविधीला सरपण तोडावं लागेल. कारण बिमारी चरत जाते. मुलगा अनिष्ट करण्यासाठी तयार झाला. बोटाचा अर्धा इंच गेला तरी चालेल, पण बाप वाचला पाहिजे. हेच ते सुंदर अनिष्ट.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक