शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

थेंबे थेंबे महासागर बने..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:05 IST

कोणतीही गोष्ट सतत करत राहून क्रमानं वाढवत गेल्यास आपल्या नकळत खूप मोठं कार्य घडून येतं.

- रमेश सप्रेतशी आपल्या मराठीत म्हण आहे ‘थेंबे थेंबे तळे साचे’. ही म्हण ज्या महाभागानं सर्वप्रथम तयार करून वापरली त्यानं बहुतेक सागर-महासागर पाहिलेला नसावा. त्याची मजल तळ्यापर्यंत गेली; पण महासागरसुद्धा थेंबाथेंबानेच बनतो. पावसाच्या पाण्यानं वाहणा-या नद्या आपलं पाणी सागराला, समर्पण करत असतील; पण अखेर पाऊस पडतो तो सुद्धा थेंबाथेंबानंच. ते काही वर्षापूर्वीचं गाजलेलं गाणं आठवतंय ना?‘ढगाला लागली कळ। पाणी थेंब थेंब गळं।।’ इवल्याशा पण असंख्य, अक्षरश: असंख्य थेंबांमुळेच सागर बनतो.याच चालीवर कणाकणानं जमीन किंवा वाळवंटही बनतात. श्वासाश्वासानं अख्खं आयुष्य बनतं. पैशा पैशानं रुपयाच काय अब्जाधीशसुद्धा बनता येतं. हुकुमचंद शेटजीची कथा अनेकांना माहीत असेल.मारवाड प्रदेशातून एक युवक नशीब काढण्यासाठी मुंबईत येतो. अंगावरचे कपडे नि एक पितळेचा लोटा. एवढीच त्याची मालमत्ता असते. त्याच्याच भागातून आलेल्या एका दूरच्या ओळखीच्या व्यापा-याकडे तो आपला लोटा गहाण ठेवतो. त्याला आठ आणे मिळतात. चौपाटीवर भेळ विकण्याचा व्यवसाय अगदी लहान प्रमाणावर त्या आठ आण्यातच सुरू करतो. कमीत कमी खर्च स्वत:वर करून पैसे साठवत जातो. नवे नवे छोटे धंदे करून हळूहळू त्याची मिळकत वाढत तो सोन्याच्या व्यापारात उतरतो. पुढे एवढा श्रीमंत होतो देश विदेशात जिथं जिथं हुकूमचंद शेटजी जात तिथं तिथं सोन्याचे भाव वाढत असत. एवढी हुकूमत शेटजींनी सुवर्ण व्यापारावर स्थापन केली तरी एक खंत त्यांना होती. हजारो-लाखो रुपये देऊ करूनही त्यांचा पितळेचा लोटा ज्या व्यापा-याकडे गहाण ठेवला होता त्यानं तो परत केला नाही. तो व्यापारी म्हणत असे, ‘असेल जगातला एक मोठा श्रीमंत व्यापारी हुकूमचंद, पण त्याची शेंडी मात्र माझ्या हातात आहे. ही गोष्ट सोडली तरी जेव्हा जेव्हा हुकूमचंद शेटजींना त्यांच्या अभूतपूर्व यशाचं रहस्य विचारलं जायचं तेव्हा तेव्हा ते म्हणायचे, ‘मैने तो पैसा पैसा बचाके हिमालय जैसी दौलत जमायी’ अगदी खरं आहे हे.एका शाळेत एके दिवशी एक शिक्षक एका वर्गात गेले नि फलकाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एक भली मोठी संख्या लिहून मुलांना ती वाचायला सांगितली. ‘एकं दहं शतं..? करत पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ती संख्या वाचली. एक लाख! काय दाखवत होती ती संख्या? रुपये? तसं लिहिलं नव्हतं.  मग गुरूजींना काय सांगायचं होतं? ते म्हणाले चातुर्मास सुरू होतोय. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यात म्हणजे सुमारे १२० दिवसांत आपण चाळीस विद्यार्थी ही संख्या पुरी करणार आहोत. उद्या पहिला दिवस. सर्वानी एक नमस्कार घालायचा. आरामात. परवा आणखी एक वाढवून दोन नमस्कार घालायचे. रोज असा एकेक नमस्कार वाढवत जायचं. चातुर्मास संपेल तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण रोज १२० नमस्कार घालू शकेल. आपला एक लक्ष नमस्कारांचा संकल्प पुरा होईलच; पण पुढे आयुष्यभर एक व्रत म्हणून घालत राहिलात तर उत्तम आरोग्याचं वरदान मिळेल नि जीवन आनंदात जाईल. त्या मुलांवर नमस्काराचा शारीरिक प्रभाव पडलाच; पण बुद्धीवर दोन संस्कार घडले. एक म्हणजे एकेका वाढत्या संख्येचा प्रभाव नि दुसरा संस्कार एकत्र येऊन सामूहिक रीतीनं कोणतंही काम केल्यास उद्दिष्टांची पूर्ती होतेच होते. कोणत्याही कामात सातत्य हवं नि अगदी थोडं थोडं क्रमानं वाढवत गेल्यावर घडून येणारा कल्पनेच्या पलीकडील परिणाम याचा अनुभव सर्वाना येतो.एक मजेदार उदाहरण पाहू या. एका व्यापा-याकडे एक अरब व्यक्ती येते. हातात बॅग नि बॅगेत पैसे. आल्या आल्या तो अरब त्या व्यापाऱ्याला विचारतो, ‘आपण एका महिन्याचा करार करू या का?’ ‘कोणता करार?’ म्हणून विचारल्यावर तो अरब स्पष्ट करतो मी तुला रोज एक लाख रुपये देईन. त्याच्या बदल्यात तू पहिल्या दिवशी फक्त एक पैसा मला द्यायचा. दुसरे दिवशी दुप्पट म्हणजे दोन पैसे. तिसरे दिवशी दुप्पट म्हणजे चार पैसे असं महिनाभर करायचं. मी तुला रोज एक लाख रुपये म्हणजे तीस लाख रुपये देणार. त्या चतुर व्यापा-यानं एका आठवडय़ाचा तोंडी हिशेब केला. आपल्याला फक्त एक रुपया सत्तावीस पैसे द्यावे लागणार; पण आठवडय़ात अरब आपल्याला सात लाख रुपये देणार. त्यानं करार केला. दुस-या आठवडय़ानंतर हा व्यापारी अरबाला विचारतो, ‘आपण कराराची मुदत वाढवू या का?’ कारण त्या व्यापा-याला हा सौदा खूप फायद्याचा वाटला. अरब काहीच बोलला नाही; पण शेवटी शेवटी त्या व्यापाऱ्यावर पश्चातापानं रडण्याची पाळी आली. किती मोठी रक्कम त्याला त्या अरबाच्या तीस लाख रुपयांच्या बदल्यात द्यावी लागली याचा हिशेब आपला आपण करू या. खरंच करून पाहायला हरकत नाही. हल्ली सर्वाच्या मोबाइल, लॅपटॉपवर कॅलक्युलेटर असतातच.या सर्वाच्यातला समान धागा कोणता माहितै? कोणतीही गोष्ट सतत करत राहून क्रमानं वाढवत गेल्यास आपल्या नकळत खूप मोठं कार्य घडून येतं. एकेका पावलापुरता प्रकाश पाडणारा कंदिल सुद्धा आपल्याला खूप दूर असलेल्या आपल्या मुक्कामापर्यंत घेऊन जातो. आपली प्रार्थना असली पाहिजे ‘देवा, फक्त एका पावलापुरता प्रकाश माझ्या अंधा-या वाटेवर पाड. मग बघ कितीही दूरच्या ठिकाणी मी पोचतो की नाही ते!’

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक