शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

देश-विदेशात असे करतात पितरांचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 08:46 IST

विदेशांतही पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी काही ना काही केले जाते. आपल्याकडे त्याला श्राद्ध, पितृपक्ष असे म्हटले जात असले तरी तिकडे त्याला वेगळे नाव असते.

भारतात ज्याप्रमाणे मृत व्यक्तीचे श्राद्ध करतात, पितृपक्षात सर्व पितरांना अन्न, तिलोदक देतात, त्याप्रमाणे जगाच्या पाठीवर इतर देशांमधीललोक पितरांचे स्मरण करतात का? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. परंतु आपल्याला वाचून आनंद वाटेल की विदेशांतही पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी काही ना काही केले जाते. आपल्याकडे त्याला श्राद्ध, पितृपक्ष असे म्हटले जात असले तरी तिकडे त्याला वेगळे नाव असते. बहुतेक सर्व सभ्यतांमध्येपूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत. तसे असले तरी त्यामागील भावना मात्र कृतज्ञतेचीच आहे. या आहेत

जगभरातील विविध देश, लोकसमूहांच्या पितरांचे स्मरण करण्याच्या पद्धती-

१) महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो, सर्वपित्री अमावास्या होते, तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडूत आदि अमावसायी, केरलमध्येकरिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.

२) नेपाळमध्ये आॅगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले, असे मानतात.

३) लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो पाळतात.

४) कंबोडियात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला आहे. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहारात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीतजाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात.

५) कोरियात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात. विशिष्ट वाणाचा भाताचा पिंड करून वाहतात. त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात.

६) मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात.

७) व्हिएतनाममध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात.

८) चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळाततेथे पाऊस असतो, सुगी असते.

९) जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरी म्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यातसोडतात, तिस-या दिवशी तीरो नागाशी हा विशेष अन्नपदार्थ करतात.

१०) इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात.

११) जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो.

१२) रोममध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे.

१३) मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात.

१४) हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात, त्या दिवसांचे नाव आहे जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यातसंवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात.

१५) मेक्सिकोमध्ये आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिआ द ला मुरतोस हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.

१६) अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मेमधला शेवटचा सोमवार मनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी.

१७) आॅल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

संकलन: सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक