शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:19 IST

चातुर्मास विशेष... आध्यात्मिक

सोलापूर :  ‘माणसाच्या हृदयात ईश्वराचा वास असतो. हा संतांनी दिलेला ईश्वराचा पत्ता होय, म्हणून ईश्वरप्राप्तीसाठी सामान्यांची सेवा करा’, असे प्रतिपादन गौतममुनीजी यांनी केले. 

जीवनाला जर प्रगतीकडे घेऊन जायचे असेल तर सत्संग करणे गरजेचे आहे. संतांचे दर्शन म्हणजे जीवनातील सूर्योदय. संतांची वाणी म्हणजे अमृतच. संत आपल्या वाणीतून अमृत देऊन लोकांच्या ज्ञानाची तहान-भूक तृप्त करतात, म्हणून आनंदाने वाणीरुपी रस प्राशन करा. महापुरुषांचे आचार व विचार इतके प्रभावित असतात की जे अशक्य आहे ते शक्य करण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादात असते. 

संतांच्या सान्निध्यामुळे आपल्या जीवनाचा उत्कर्ष होतो. त्यांच्या दिव्य संदेशानुसार आपले आचरण ठेवल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आचार्य महाराज श्रीमद् रत्नप्रभ सुरीजी महाराज यांनी आजच्याच दिवशी ओसवाल समाजाची स्थापना केल्याचा इतिहास सांगितला. यावेळी सागरमुनीजी म्हणाले, देव, धर्म आणि गुरु हेच आपल्या जीवनाचे मुख्य तत्त्व होय. या तत्त्वांची आराधना केल्यास आपले जीवन उच्च शिखरावर पोहोचेल. सत्य-असत्य, लोक-देवलोक, सुदर्शन आदींबाबत त्यांनी विस्तृत विवेचन केले. 

संसार करा, व्यापार करा, धर्म करा, पण आपली बुद्धी जागृत ठेवून करा. आपल्या हातून रोजच्या दैनंदिन व्यवहारात दुष्कृत्ये घडणार नाहीत याची काळजी घ्या. धर्मात आळस नको, आळस झटकून धार्मिक कार्यास श्रद्धेने प्रारंभ करा. श्रद्धा हा माणसाचा स्थायीभाव आहे. परमार्थात तर श्रद्धेचे महत्त्व अपरंपार आहे. संतांच्या चरणी नितांत श्रद्धा असल्याशिवाय साधकांचे परमार्थात प्रगती होणे शक्य नाही.-  गुरु आनंद कमल कन्हैया, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक