शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

आत्मानंदातच परमानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 09:59 IST

मनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते.

- स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमनाची स्थिरता असली की मनाची परिपक्वता झाली असे समजतो. त्रिगुणात्मकरूपाने संचार करणारे मन स्थिरतेकडे वळवणे फार महत्त्वाचे असते. स्थिर मनाला सदा पर्वकाळ असतो. प्राणिमात्राविषयी त्याचे मन स्थिर असते. त्याच्यापाशी शांती वास करते. दयावान मन म्हणून त्याची कीर्ती होते. त्या मनाला संसाराची चिंता राहात नाही. स्व-लीला, स्वल्पता त्याची त्याला कळते. ते मन बोलायला लागले की सर्वत्र आनंदाची निर्मिती होते. विवेक, वैराग्य, क्षमादी गुण त्याच्या अंगी वसलेले असतात. पण त्या मनाकडून निष्कर्मसिद्धी घडतात. योग-यागादी साधनावर त्यांनी आपला विजय प्राप्त केलेला असतो.

रिद्धी-सिद्धी त्या मनावर लोटांगण घालतात. त्या स्थिर मनात ईश्वरतत्त्वाचे अखंड चिंतन चालते. ते मन उदार, दयाळू असते. त्या मनाला प्रेमपान्हा पान्हावतो. सर्वांना आपल्या कुशीत कुर्वाळणारे ते मन असते. आंतर-बाह्य ते निर्मळ असते. सर्व दु:खाला पचवून टाकते. संसाररूपी सागरातून मुक्त होेते. सर्वसुखे त्याच्याजवळ असतात. युक्ती-मुक्ती त्याला लोटांगण घालतात. त्या मनाला सतत ईश्वरचिंतन घडते. त्याचेच त्याला ध्यान लागते. त्याला सतत त्याचीच आठवण होते. अंती त्या मनाचे विश्रांतिस्थानी भगवंताचे चरणच आहे. संत तुकाराम महाराजही हेच म्हणतात, ‘‘आता कोठे धावे मन। तुमचे चरण देखिलिया।।’’ त्या मनाला पुन्हा कुठेही जायची गरज नाही.

ते ह्या ईशतत्त्वाशी एकल्प होते. मग कुठेही त्याला भटकता येत नाही. त्या स्थिर मनाचे हे लक्षण आहे. मग त्या मनाला भजनात-कीर्तनात-सर्वदूर संतोष होतो. हरिजागरणात ते मन स्वयंसिद्ध प्रकट होते. निजात्म स्थितीचा त्याला बोध होतो. परमार्थ हा त्याचा भाव बनतो. स्थिर मनच हे सर्व करू शकते. म्हणून श्रीमद्भागवत गीतेतही अर्जुनाला स्थिर मनाचे महत्त्व भगवंताने सांगितले आहे. कलियुगात स्थिर मन करणे महत्त्वाचे आहे. कारण स्थिर ‘मन’ आत्मानंदाची निर्मिती करते. म्हणून म्हणावेसे वाटते आत्मानंदातच परमानंद आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक