शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सगुणभक्तीचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

आपण सगुण देवाचे चरित्र का थोर मानावे म्हणता? कारण देव तर निर्गुण आहे म्हणतात. तो दिसत नाही म्हणतात. मग त्या सगुण देवाची पूजा निर्गुण देवाला मानवते का? याचे उत्तर मी पत्राद्वारे कळवीत आहे.

प्रिय मित्र ,आपण सगुण देवाचे चरित्र का थोर मानावे म्हणता? कारण देव तर निर्गुण आहे म्हणतात. तो दिसत नाही म्हणतात. मग त्या सगुण देवाची पूजा निर्गुण देवाला मानवते का? याचे उत्तर मी पत्राद्वारे कळवीत आहे. मित्रा, समाजाचे हित, दलित, गरीब, अज्ञानी यांना उन्नत करण्यासाठी ज्यांची अहोरात्र धडपड चाललेली असते व भाविकांच्या या श्रद्धेला फळाफुलानेही प्रसन्न होऊन जो त्याच्या हृदयाचे बोल ओळखतो व त्याच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करून रानावनात जाणे पत्करतो, गरीब किसानाची मुले शाळेत जात नव्हती व त्यांना समाजधर्माचे यथार्थ ज्ञान नव्हते म्हणून गाईगुरे चारण्याचे निमित्त करून ब्रह्मज्ञान देतो व धर्म स्थापनेसाठी म्हणजे अन्यायाच्या प्रतिकाराची शक्ती निर्माण करण्याकरिता ज्याने आपले जीवन पणाला लावले आहे अशा मानवांनाच आम्ही सगुणदेव मानले आहे व असाच पुरुष देवत्व प्राप्त करू शकतो, अशी आमची धारणा आहे. म्हणून ज्या कुणी असे जीवन घालविले असेल ते सर्व आमचे देव झाले आहेत. हीच आमची सगुण देवाची व्याख्या आम्ही केलेली आहे. अशांचे चरित्र पवित्र भावनेने वाचून आपणही त्यांचे वाटेकरी होऊ या. मनाला असे संस्कार देण्याकरिताच आपण देवळात जावे आणि त्या पाषाण मूर्तीकडे प्रेमळ नेत्राने, अष्ट-सात्विक भावाने बघावे. म्हणून मी तुम्हाला सगुण-भक्ती सांगत असतो. पाषाण पूजण्यासाठी नव्हे तर ज्यांनी मानवजातीवर उपकार केले त्यांचे स्मृतिचिन्ह पाहून आपल्यालाही तोच छंद लागावा व आपल्या हातूनही असे देवप्रिय कार्य घडावे, हाच त्याचा उद्देश आहे. एरव्ही निर्गुण देवाला आपण कसे जाणणार? कारण जाणणे हे सुद्धा निर्गुणाचा विषय होऊ शकत नाही. संत म्हणतात, ‘जाणीव नेणीव भगवती नाही’ यावरून निर्गुणाची वाचिक संगती लावता येते व एवढा वृत्तीचा सूक्ष्मपणा ज्यांना अनुभवता येतो त्यांनी खुशाल निर्गुणाचा मार्ग चोखाळावा. पण तुमच्यासारख्या भाविकांनी त्यात पडू नये. खुशाल देवळात जावे. नाम घ्यावे. चिंतन करावे व पवित्र कार्याला लागावे. हेच जरी आपणाला साधले तरी आपण देवाच्या प्रीतीला पात्र होऊ शकतो. म्हणूनच मी सगुण देवाचे भजन महान आहे, असे आपणास सांगितले आहे.                                                                                                                                                      -तुकड्यादास

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज