शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानमय प्रतल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 05:25 IST

प्रकृतीच्या प्रचंड अशा भरलेल्या व गूढ असलेल्या प्रदेशात जे जीवात्मे राहतात त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. मानव, अमानव व कृत्रिम मानवातील आणखी वर्गीकरण म्हणजे पृथ्वीवरील भौतिक शरीर असलेले व भौतिक शरीर नसलेले मानव.

- डॉ. मेहरा श्रीखंडे  प्रकृतीच्या प्रचंड अशा भरलेल्या व गूढ असलेल्या प्रदेशात जे जीवात्मे राहतात त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. मानव, अमानव व कृत्रिम मानवातील आणखी वर्गीकरण म्हणजे पृथ्वीवरील भौतिक शरीर असलेले व भौतिक शरीर नसलेले मानव. आपण या आत्म्यांना मेलेले म्हणू शकत नाही. कारण विज्ञानमय प्रतलात कोणीही मेलेले नसते. आपणापेक्षा त्यांच्यात जिवंतपणा जास्त दिसून येतो. पृथ्वीवरील जीवात्म्यात जे विचार, भावना व स्वभाववैशिष्ट्ये दिसतात तशीच सर्व विज्ञानमय प्रतलातही दिसतात व त्यांचा चेहरा व शरीर पृथ्वीवर जसे दिसते तसेच विज्ञानमय कोषातही दिसते.हे जीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यांची दोन सौंदर्यस्थाने म्हणजे त्यांचे असलेले अंतर्गत आध्यात्मिक वैशिष्ट्य व स्वत:ला आपल्या मनाप्रमाणे दृश्य व अदृश्य करण्याची ताकद. त्यांची आयुष्ये आपल्यापेक्षा खूप मोठी असून त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या आयुष्याची मर्यादा ठरते. विज्ञानमय आत्मे खूप वर्षांपूर्वी मेलेल्या आप्तस्वकीयांना भेटू शकतात. काही आध्यात्मिक लोक जे ध्यानधारणेत पारंगत असतात ते या माहिती नसलेल्या प्रतलाशी जुळवून घेऊन मनाच्या एकाग्रतेने या विज्ञानमय प्रतलात आपल्या मनाप्रमाणे कुठेही वावरू शकतात. काहीजण तर विज्ञानमय प्रतलात जे त्यांनी बघितले व ज्यांना ते भेटले त्या सर्व आठवणी जागृतावस्थेतही आणू शकतात.हे शरीराबाहेर जाऊन येण्याचे प्रयोग करण्यासाठी शिक्षण व खूप मेहनत यांची आवश्यकता असते. आश्चर्य म्हणजे जी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असते तिचे विज्ञानमय शरीर हे कमी उन्नत असलेल्या व्यक्तीच्या शरारीपेक्षा चांगले असते. एक सर्वसामान्य समजूत अशी आहे की, झोपेमध्ये मनुष्याचे विज्ञानमय शरीर हे भौतिक शरीरापासून वेगळे होऊन विज्ञानमय जगातील वेगवेगळ््या प्रवाहातून ते फिरत असते. इथे ती अनेकांना भेटते व तिला अनेक चांगले व वाईट अनुभव येतात जे ती आपल्या भौतिक शरीरातील मेंदूला पोहचविते व ते आपल्याला स्वप्नाच्या स्वरूपात दिसतात. स्वप्नातील अनेक अनुभवांपैकी हा एक अनुभव म्हणता येईल. सामान्य माणसातील विज्ञानमय शरीराला या प्रतलाचे ज्ञान नसल्यामुळे हे अनुभव त्याला अत्यंत सुस्पष्ट व धूसर दिसतात. त्यांचे उद्देश हे नकारात्मक व वाईट असल्यामुळे जे व्हुडो व काळी जादू करतात. ते या विज्ञानमय प्रतलात जाऊन येऊ शकतात. पण पारंगत होऊ शकत नाहीत.ज्यांना विज्ञानमय प्रतलाची नीटशी माहिती नाही, त्यांनी अशा या त्रास देणाºयांना जरा टाळणेच बरे. या विषयाबद्दल बहुतेकांना कुतूहल आणि उत्सुकता असते. परदेशातही या विषयावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. भारतातही अनेकांनी या विषयावर अभ्यास केला आहे. जीवांचा हा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणचा प्रवास ही बाब गूढ वाटते. मात्र, या विषयावर अनेकांना तपशील जाणून घ्यायचा असतो. शरीराबाहेर जाऊन येण्याचे हे प्रयोग अतिशय सखोल अभ्यासाचा विषय आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक