शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भगवंत भक्तीत अर्पणवृत्ती महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 05:11 IST

भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही.

- वामन देशपांडेफलेच्छेतून निर्माण झालेली कर्मासक्ती माणसाला कर्मबंधनात अडकविते. सत्यच जर सांगायचे झाले, तर कर्मबंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कर्म आणि कर्मफल त्याविषयी वाटणारी विलक्षण ममता आणि तीव्र स्वरूपातली आसक्ती पूर्णपणे नष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. भगवंतांची प्राप्ती व्हावी, हा सदभाव सर्वांगात एकदा का सळसळू लागला की, मर्त्य विश्वातल्या कुठल्याही स्वरूपातल्या गोष्टींविषयी अथवा पदार्थांविषयी मनात आसक्तीच निर्माण होत नाही. स्वत:च्या देहाविषयी ममता सहजरीत्या लोप पावते. ही सर्वोत्तम साधनावस्था असते. अशा उच्चावस्थेला एकदा का साधक पोहोचला की, तो करीत असलेले प्रत्येक कर्म मग तो भगवंतांचे स्मरण करीत, त्याच्याच साक्षीने करतो आणि पूर्ण झालेले कर्म, फलासहित भगवंतांनाच अर्पण करतो. फक्त भगवंतांचीच उपासना करतो, अशा श्रेष्ठ साधकांविषयी आपले मत प्रकट करताना म्हणतात की,तेषामहं समुद्धता मृत्युसंसारसागरात।भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम।।पार्था, ज्या साधक भक्तांचे अवघे चित्त माझ्यातच पूर्णपणे गुंतलेले असते, जे केवळ माझ्याच नामसाधनेत गुंतलेले असतात, अशा श्रेष्ठ परमभक्तांना मृत्यूसम असलेल्या संसारसागरातून अलगदपणे उचलून घेत, मोक्षमार्गावर आणून सोडतो. जन्ममृत्यूच्या चक्रातूनसोडवितो. त्याचा योग्यसमयी उद्धार करतो. त्यांना मोक्षाचे वरदान देतो. भगवंतांप्रती एकदा का अर्पणवृत्ती निर्माण झाली, भगवंतांसाठी प्रत्येक कर्म करण्यास मन उद्युक्त झाले की, भक्तियोग खऱ्या अर्थाने सिद्ध होतो. अशा परमभक्तीतच साधकाची साधना पूर्णत्वाला पोहोचते. देहबुद्धी संपुष्टात आली की, आत्मसाक्षीने जगणे सुरू होते. सर्वस्वाचा त्याग करून आयुष्य भगवंतभक्तीत एकदा का तन्मय झाले की, भक्ती साधनेला विलक्षण गती प्राप्त होते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक