शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

चिंता सोडा...सुखी रहा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:49 IST

मी जीवनात पुढे जाऊ शकतो, आणि मी जाणार...!

जीवनात अनेकदा जे वाईट झाल त्याचा स्वीकार करून पुढे जाव लागत. हे झाल आहे, आणि ते बदलू शकत नाही. परंतु मी जीवनात पुढे जाऊ शकतो, आणि मी जाणार.  या सकारात्मक विचारांनीच जीवनात सर्व समस्यांना सामोरे गेलं पाहीजे. आयुष्यात अनेक जण अनेक लोक अपयशी झालेत. मात्र, त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. तसंच चिंता सोडल्यास मनुष्य सुखी होवू शकतो.  

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये चिंतेचे प्रमाण जास्त आहे. बºयाच स्त्रिया आपले संपूर्ण  आयुष्य विविध प्रकारच्या चिंतेच्या छायेखाली जगतात. काही स्त्रियांमध्ये या सामान्य वाटणाºया चिंतेचे विविध आजारामध्ये रूपांतर होते. चिंता  ही शरीराला हळुहळु खातं जाते. त्यामुळे सकारात्मक उजेर्ने चिंतेला सामोरे जाणं गरजेचे आहे.

जीवनात कितीही वाई घडले; वाईट झाले तरी,  संयम आणि वेळेच्या औषधाने एकदिवस सर्वकाही बरे होते. कालांतराने सर्व संकटे ही पुरस्कारच घेवून येतात. असा आत्मानुभव प्रत्येकाला येतो. चिंता ही चितेसमान असल्याने कुणीही निराश होता कामा नये. भगवंत आणि ही सृष्टी कुणाचेही वाईट करीत नाही. चिंतेच्या आजारात एखादी न सोसणारी त्रासदायक घटना या लक्षणांची सुरुवात करते. मग ही लक्षणे सोसणेसुद्धा रुग्णास असह्य होते. सांगता येत नाही व सोसतही नाही असे अवघड दुखणे म्हणजे चिंतेचा आजार. म्हणूनच चिंतेबाबत स्वत:शी तर्क करत बसण्यापेक्षा तणाव वा चिंता कमी करणं हाच सर्वात उत्तम उपाय आहे. - ह.भ.प. सुखदेव धारेराव महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक