शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
3
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
4
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
5
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
6
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
7
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
8
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
9
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
10
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
11
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
12
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
13
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
14
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
15
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
16
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
17
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
18
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
19
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

खरं दारिद्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 05:50 IST

दारिद्र्य आणि गरिबी याचा कुठेही सुतराम संबंध नसतो.

विजयराज बोधनकरदारिद्र्य आणि गरिबी याचा कुठेही सुतराम संबंध नसतो. उलट मनात सतत नकारात्मक विचार येत राहणं हेच खरं त्या मनबुद्धीचं दारिद्र्य असतं. मग तो श्रीमंत असो वा गरीब असो. बरेचदा आर्थिक पोकळीमुळे गरिबी येते, पण कधीच दारिद्र्य येतं नसतं. अनेक गरीब घरात सत्त्वशील माणसं जन्म घेतात व अनेक श्रीमंत घरातही दारिद्र्य पाय रोवून बसलेलं असतं म्हणून गरिबी आणि दरिद्री यात खूप फरक आहे. आर्थिक गरिबी ही सभोवतालच्या परिस्थितीतून जन्म घेत राहते, अनेकांचं शिक्षण परिस्थितीमुळे पूर्ण होत नसतं. या कारणामुळे अनेक संधी हुलकावण्या देतात आणि पुढे आर्थिकतेची घडी बसत नसते, अशी खूप उदाहरणं आहेत. त्याला दारिद्र्य म्हणता येणार नाही. त्याउलट संयत राहून परिस्थितीनुसार बदलत जाणं हे खरं उत्तम जीवन असतं. दारिद्र्य म्हणजे खऱ्या अर्थाने बुरसटलेले विचार घेऊन जगणं. समाधानी माणूस हा कधीच भौतिक सुखाच्या मागे लागत नाही. त्याउलट अतिसमाधानी असणं हेही एक दारिद्र्य असतं. आळस हा जीवनातला मोठा शत्रू आहे. त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला होतो. अतिसमाधानी म्हणजे कर्महीन असणं आणि मग त्यातून आलेल्या गरिबीचं कारण ‘नशीब’ असं सांगत बसणं हा त्या सांगणाºयाचा दांभिकपणा असतो. गरज नसताना अति पैशाच्या मागे लागणं हे खरं वैचारिक दारिद्र्य असतं. अतिसुखामुळे मुलांची बौद्धिक, मानसिक क्षमता हळूहळू क्षीण होत जाते. सर्व काही तयार पुढ्यात मिळतं, जगण्यात एक संथपणा येतो आणि अशा अनेक घरांत भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा घराच्या, आरोग्याच्या नाशाला कारणीभूत ठरत जातो आणि हेच जगण्यातलं मोठं दारिद्र्य म्हणायला हवं. उत्तम लोकांचा सहवास, उत्तम वाचन, उत्तम श्रवण, चिंतन अन् मनन यातून वैचारिक दारिद्र्य नष्ट होत जाऊन शाश्वत आयुष्य पदार्पण करीत राहतं. दारिद्र्य निर्मूलनाचा हाच एकमेव मार्ग असू शकतो.