शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

रामभक्त हनुमान शक्ती आणि भक्तीचा अपूर्व संगम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:34 IST

हनुमान, हनुमंत, मारुती, कपिश्रेष्ठ, महारुद्र, आंजनेय, प्रभंजन, रामदूत अशी अनेक नावे धारण करणाऱ्या रामभक्त हनुमानाला नमस्कार.

- शैलजा शेवडेहनुमान, हनुमंत, मारुती, कपिश्रेष्ठ, महारुद्र, आंजनेय, प्रभंजन, रामदूत अशी अनेक नावे धारण करणाऱ्या रामभक्त हनुमानाला नमस्कार. शक्ती आणि भक्तीचा अपूर्व संगम. रुद्राचा अवतार असा मारुती. रामायणातील सुंदर कांड म्हणजे महाबली हनुमानाच्या अतुल सामर्थ्याची आणि अद्भुत सामर्थ्याची दिव्य गाथा आहे. रामरक्षेत त्याची जितेंद्रिय, बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मज वानरयुथमुख्यं अशी नावे आहेत. समर्थ रामदासांनी मारुतीची आरती लिहिली. मारु ती स्तोत्र लिहिले, मारुती नमस्कार लिहिले. रामायणात रामभक्त हनुमानाचे अत्यंत सुंदर वर्णन आहे, सीतेला रावणाने समुद्रापार लंकेतील वनामध्ये बंदिस्त करून ठेवले आहे, हे अंगदाच्या नेतृत्वाखाली गेलेल्या वानरसेनेला कळले. आता शंभर योजने समुद्र उल्लंघून जाण्याचा आणि परत येण्याचा प्रश्न होता. नल, नील, जांबुवान प्रत्येकाने आपापल्या बळाचा उच्चार केला, पण कोणीच समर्थ नव्हता. दूर एकीकडे बसलेल्या हनुमानाला जांबुवानाने गाठले. त्याला त्याच्या प्रचंड सामर्थ्याचे स्मरण ‘हे समस्त वानरकुलात सर्वश्रेष्ठ, सर्वशास्त्रविशारद हनुमाना, तू गप्प का बसला आहेस. तू सुग्रीवाला तुल्यबळ आहे, इतकंच नाही, तर तेज आणि रामलक्ष्मणाच्या बरोबरीत आहेस असं मला वाटतं,’ या शब्दांत करून दिलं. आपल्या सामर्थ्याचे स्मरण होताच हनुमानाने अतिप्रचंड रूप धारण केले आणि त्या महापराक्रमी, विचारी वानरश्रेष्ठाने मन स्वस्थ ठेवून लंकेचे स्मरण केले. महेंद्र पर्वतावरून आकाशात झेप घेतलेला वायुपुत्र मध्ये कोठेही न थांबता शंभर योजने समुद्र उल्लंघून लंकेच्या किनाºयावर पोचला. सीतेपाशी रामाचा दूत बनून पोचला. तो महावीर हनुमान आमच्या मनात अखंड रामभक्ती निर्माण करो. आम्हाला सामर्थ्यशाली करो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक