शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

इस्लामी विचारधारेची निर्मिती कुराणातूऩ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:58 AM

अध्यात्मिक.....

इस्लामी विचारधारेची निर्मिती कुराण आणि प्रेषितांच्या आचरण तत्त्वांच्या एकत्रीकरणातून झालेली आहे. प्रेषितांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग मानवी जीवनाला मार्गदर्शक, प्रेरक ठरू शकतील, असे आहेत. प्रेषितांच्या आयुष्यातील अशा अनेक प्रसंगांना जगभरातील साहित्यामध्ये वेगवेगळ्या रूपात स्थान मिळाले आहे. प्रेषितांच्या आयुष्यातील अनेक घटना, अनेक प्रसंग वेगवेगळ्या भाषांमधल्या साहित्यिकांनी वेगवेगळी पात्रे वापरून सादर केले आहेत.

प्रेषित त्यांच्या आयुष्यात अनेक प्रसंगी उदार मनाने, मानवतेने वागले आहेत. प्रेषितांच्या आयुष्यातील हे प्रसंग इस्लामच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यातील एका वृद्ध स्त्रीविषयी प्रेषितांनी दाखवलेली परहित सहिष्णू वृत्ती इस्लामी इतिहासामध्ये बोधप्रद मानली जाते. ही घटना प्रेषितांनी मक्केवर विजय संपादित केल्यानंतरची आहे. प्रेषितांकडे इस्लामी राज्याची धुरा होती. त्यावेळी प्रेषित (स.) त्यांना त्रास देणाºया कोणत्याही व्यक्तीस शिक्षा देऊ शकत होते. त्यामुळे त्या वृद्ध स्त्रीविषयीच्या प्रसंगात प्रेषितांनी दाखवलेल्या उदारतेस अत्यंत महत्त्व आहे. 

 प्रेषित मोहम्मद (स.) नमाजाला जाण्यासाठी निघाले की, एक वृद्ध स्त्री त्यांच्या अंगावर कचरा टाकत असे. त्यामुळे प्रेषितांचे कपडे खराब होत होते. पण प्रेषितांनी कधीही त्या वृद्ध स्त्रीला याविषयी जाब विचारला नाही. कित्येक दिवस प्रेषित (स.) नमाजाला जात असताना ती स्त्री त्यांच्या अंगावर घाण टाकत असे. एकेदिवशी त्या स्त्रीने प्रेषितांच्या अंगावर नमाजाला जाताना घाण टाकली नाही. तेव्हा प्रेषितांनी घरी जाऊन त्या वृद्ध स्त्रीची चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की, ती वृद्ध स्त्री आजारी आहे. त्यानंतर प्रेषितांनी खूप काळजीपूर्वक त्या वृद्धेची विचारपूस केली, नंतर त्या स्त्रीचे निधन झाल्यानंतर प्रेषितांनी तिच्या अंत्ययात्रेस खांदाही दिला.

इस्लामी बोधकथांमध्ये प्रेषित इब्राहिम (अ.) यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा समावेश होतो. प्रेषित इब्राहिम (अ.) यांना मक्के तील लोकांनी मूर्ती फोडल्याचा आरोप लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला प्रेषित इब्राहिम (अ.) यांना आगीत टाकण्यात आले. मक्का शहरातील लोक बघ्याच्या भूमिकेत होते. तितक्यात एक चिमणी तेथे आली. तिने शेजारी असलेल्या जलसाठ्यातून पाणी आणून आपल्या चोचीतून आगीवर टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा सैतानाने तिची टिंगल केली. तो म्हणाला, ‘इतक्या पाण्याने ही आग थोडीशी विझणार आहे’. तेव्हा ती चिमणी म्हणाली, ‘आग विझेल की नाही, याची मला कल्पना नाही. पण उद्या ज्या वेळेस आग लावणाºयांचा हिशेब घेतला जाईल, त्यावेळी माझे नाव आग विझवणारा यांच्या यादीत असेल.’    - आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzan Eidरमजान ईद