शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

आनंद तरंग - एक प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 04:34 IST

चांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असते.

नीता ब्रह्मकुमारीचांगल्या-वाईट सर्व घटनांच्या पाठीमागे आपलेच कर्म कार्य करीत असते. फार वर्षांपूर्वीची सत्यघटना. अहमदाबादला एक विद्वान, अनुभवी सत्र न्यायाधीश होते. वेदांचे गाढे अभ्यासी व कर्मसिद्धांतावर जबर विश्वास ठेवणारे. एका गावी नदीकाठी गेले असताना एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. सुरा हातात असलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तत्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज्ज साहेबांनी बरोबर बघितला होता. काही महिन्यानंतर तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला व तो त्याच न्यायाधीशांसमोर; परंतु आरोपीच्या पिंजºयात उभा असणारा संशयित कोणी दुसरीच व्यक्ती आहे हे त्यांच्या लक्षात येते. पुढे पोलिसांनी आरोपीविरुद्ध इतका सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता, असे साक्षी पुराव्याने सिद्ध झाले व आरोपीला फाशीची शिक्षा दिली.

सत्य परिस्थिती जाणणाºया न्यायाधीशांनी आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खासगीत बोलण्यासाठी पाचारण केले. आरोपी रडू लागला व वारंवार म्हणू लागला की ‘मी निर्दोष आहे. पोलिसांनी माझ्याविरुद्ध जबरदस्त पुरावे सादर करून कायद्याने मला खुनी ठरवले.’ न्यायाधीशांनी संमती दिली; परंतु कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो हे त्याला समजावले; परंतु परमेश्वरनिर्मित कर्म-कायद्यात कधीही गफलत होऊ शकत नाही हेही तितकेच खरे. त्यांनी त्या आरोपीला विचारले, ‘ईश्वराला स्मरून सांग, भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का ?’ आरोपीने रडत सांगितले की पूर्वी एक सोडून दोन खून केले होते; परंतु पैशांच्या जोरावर नामवंत हुशार वकील नेमल्याने दोन्ही वेळा सुटका झाली; पण या वेळी आर्थिक स्थिती खालावल्याने तो तसे करू शकला नाही व पूर्ण निर्दोष असूनही तोच खुनी म्हणून सिद्ध करण्यात आला. तात्पर्य हे की कर्म करण्यापूर्वी विचार तपासून घ्यावेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक