शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

काय भुललासी वरलिया रंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 04:31 IST

बाह्य उपकरणांनी देहाचा शृंगार होईल. परंतु सद्गुण आणि चातुर्य अंगी बाणवल्यास आपलं अंत:करण पवित्र व सुंदर होईल.

- मोहनबुवा रामदासीचातुर्ये शृंगारे अंतर। वस्त्रे शृंगारे शरीर। दोहीमध्ये कोण थोर बरे पाहा। । द . १४ स . ६ - १८वस्त्र , दागदागिने, स्नो-पावडर, ब्युटीपार्लरमधील विविध उपकरणे यांच्या साहाय्याने या नाशिवंत देहास सजवून कृत्रिमरीत्या सौंदर्य संपादन करण्याची सध्या स्पर्धा लागली आहे. बाह्य उपकरणांनी देहाचा शृंगार होईल. परंतु सद्गुण आणि चातुर्य अंगी बाणवल्यास आपलं अंत:करण पवित्र व सुंदर होईल. पवित्र अंत:करणाची माणसं सर्वत्र लोकप्रिय होतात हे आपण पाहतोच. सुंदर दिसण्यापेक्षाही सुंदर असणं अधिक महत्त्वाचं आहे. परंतु बहुसंख्य माणसं व्यक्तीच्या बहिरंगावरून व्यक्ती थोर किंवा लहान हे ठरवतात?, हे बरे नव्हे. स्वामी विवेकानंद शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेसाठी गेले. भगवी वस्त्रं परिधान केलेला हा कोण विचित्र भिकारी आहे, म्हणून लोकांकडून त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला. परंतु संधी मिळताच त्यांनी आपली विद्वत्ता, अंत:करणाची व्यापकता जगाला दाखवून दिली आणि सारे जग त्यांना ओळखू लागले. अंतरंगातील गुण हे सद्गुुणी माणसं व्यक्त होतात, तेव्हाच इतरांना समजतात. पूर्वी महात्मा गांधी, विनोबा, लोकमान्य टिळक, सावरकर, तर विद्यमान बाबा आमटे आदी विभूतींनी ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ हे तत्त्व अंगीकारलं. श्रीसमर्थ रामदास स्वामी स्वत: फक्त कौपीन परिधान करून राहत असत. तरीही त्यांच्या विचारांनी ते समृद्ध असत, हे ध्यानात घ्यावयास हवे. म्हणून ते आपणास विचारतात की बहिरंग सजवणं आणि अंतरंग सजवणं यात श्रेष्ठ काय, याचा विचार करा. अर्थात, सद्गुुण संपादन करून आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा आणि यशस्वी व्हा. याच अर्थाचा संत चोखामेळा यांचा अभंग प्रसिद्ध आहे.ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। नदी डोंगी परि जल नोहे डोंगा। चोख डोंगी परि भाव नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक