शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 03:42 IST

सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते.

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय(भा.पो.से.)सरकारचा नियम असा आहे की जर एखाद्याने अपराध केला असेल तर त्याच्यावर पोलीस केस दाखल केली जाते व न्यायालयात त्याचेवर खटला चालतो. जर अपराध सिद्ध झाला तर त्याला शिक्षा सुनावली जाते व त्यास कारागृहात पाठविले जाते. कारागृहात गेल्यानंतर त्यास कैदी किंवा बंदी म्हटले जाते. कैदेतून बाहेर आल्यानंतर काही लोकांमध्ये सुधारणा घडून येते तर काही लोक पुन्हा अपराध करतात व पुन्हा कैदी बनून कारागृहात दाखल होतात. कैद्यांचेसुद्धा अनेक प्रकार असतात. काही कैद्यांचे अपराध छोटे तर काही कैद्यांचे अपराध गंभीर असतात. कारागृहात गेल्यानंतर जर एखाद्या कैद्याची वागणूक चांगली नसेल तर कारागृह नियमानुसार त्यास तेथेही शिक्षा दिली जाते व आवश्यकतेनुसार त्यास अतिसुरक्षा विभागात बंद करून विभक्त कोठडीत ठेवले जाते. कारागृह ही अशी जागा आहे, जेथून कोणतीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बाहेर पडू शकत नाही. एकतर न्यायालय त्याची सुटका करते किंवा त्याची शिक्षा संपल्यानंतर ती व्यक्ती बाहेर येते.या जगात राहणारे अनेक लोक कारागृहातील कैद्यांसारखे जीवन जगत असतात. विशुद्ध चेतनेच्या स्तरातून स्वतंत्र असूनसुद्धा आपण आपल्या मनोविकारात कैद असतो. शास्त्रात याच मनोविकारांना षड्दोषांच्या रूपात वर्णित केलेले आहे. हे षड्दोष म्हणजेच काम, क्र ोध,लोभ, मोह, मद व मत्सर. कामाच्या अधिकतेमुळे व्यक्ती ही कामाच्या अधीन होते व ती व्यक्ती आपले स्वातंत्र्य गमावून बसते. अशाचप्रकारे क्र ोध, मोह, मद व मत्सर आपल्याला वेगळा विचार करू देत नाही व आपण भावनेच्या आहारी जाऊन कैदी जीवन जगायला लागतो.हे दोष व विकार इतके मजबूत असतात की त्याच्या प्रभावातून मुक्त होणे मानवासाठी अत्यंत कठीण असते. गुरू किंवा संत हे न्यायालयासारखे आहेत, जे आपल्याला या विकारांच्या कैदेतून मुक्त करतात. यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान सर्वोत्तम आहे. गुरू अनेक प्रकारच्या विधीचा वापर करून लोकांना मनोविकारातून मुक्त करतात. भारतीय अध्यात्मशास्त्रात या विधींना ज्ञान, भक्ती किंवा कर्म या नावाने ओळखले जाते. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार व स्वभाव वेगवेगळे असतात. गुरूसुद्धा अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे मार्ग दाखवून मुक्त करतो. मुक्ती हा शब्दच भारतीय अध्यात्म शास्त्रात एक महत्त्वाचा शब्द आहे. या मनोविकाराच्या अनुचित प्रभावातून पूर्णपणे मुक्त होणे म्हणजेच त्या परमतत्त्वाला प्राप्त करणे होय.

टॅग्स :jailतुरुंग