शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक ऊर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 11:58 IST

आपल्या रंगावर नाही तर आपल्या अंतरंगात काय आहे यावर आपली उर्ध्व किंवा अधोगती ठरलेली असते. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती.

डॉ. दत्ता कोहिनकर

एक फुगेवाला जत्रेमध्ये हेलियम वायू भरलेले (गॅसचे) फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. मध्येच तो एखादा फुगा आकाशात सोडायाचा. उंच उडत जाणारा फुगा पाहून मुले फुगे घेण्यासाठी पालकांना आग्रह करायचे व त्याचा धंदा जोरात सुरू व्हायचा. एका लहान मुलाने या फुगेवाल्याला प्रश्न केला, काका, या निळ्या रंगाच्या फुग्याप्रमाणे पिवळा रंगाचा फुगा पण आकाशात उडेल का? मुलाची ही जिज्ञासा पाहून फुगेवाला म्हणाला, बाळा.. फुगा हा रंगामुळे नाही तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंच उडत जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यातही लागू पडते, आपल्या रंगावर नाही तर आपल्या अंतरंगात काय आहे यावर आपली उर्ध्व किंवा अधोगती ठरलेली असते. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. एखाद्या बीजामधून रोप झेपावते! पण बीजच नसेल तर रोपाचे अस्तित्व असू शकेल काय? अगदी त्याचप्रमाणे माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या विचारातून आकाराला येत असते. मंगेश पाडगावकर म्हणाले होते, पेला अर्धा भरला की सरला हे तुम्हीच ठरवायचे असते. तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर आपल्या विचारांना सकारात्मकतेचे बळ द्या. जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. 

भगवान बुद्ध म्हणतात, वाईट विचारांनी-वाईट कर्म करणाऱ्या माणसाचे मागे दु:ख अशाप्रकारे लागते जसे बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या मागे बैलगाडीचे चाक आणि चांगल्या विचारांनी चांगले कर्म करणाऱ्या माणसाच्या मागे असे सुख लागते की जशी त्याच्याबरोबर त्याची सावली. म्हणून नेहमी स्वत:बाबत आपण काय विचार करतो या स्वसंवादावर लक्ष देऊन नकारात्मकता हद्दपार करण्याची मनाला सवय लागली पाहिजे. सफरचंद हातगाडीवर विकणाऱ्या माणसाने सफरचंद ७० रुपये किलो असा फलक गाडीवर लावला होता. दिवसभर त्याला एकही ग्राहक भेटला नाही. लोकांनी त्यापेक्षा कमी भावाने त्याच्याशी व्यवहार केला.  यावरून एवढेच शिकूया, आपण समाजात जेवढी आपली किंमत लावतो (स्वमूल्य) तेवढीच किंमत किंवा त्यापेक्षा कमी किंमत समाज आपल्याला देतो, म्हणून स्वत:ला मूल्यवान समजा (सेल्फ रिस्पेक्ट). फक्त अहंकार बाळगू नका. हेलन केलरला एका श्रोत्याने विचारले, दृष्टिहिनतेपेक्षा मोठे दुर्भाग्य काय आहे? त्यावर त्या म्हणाल्या, दृष्टी असूनही ज्याच्यापुढे महान स्वप्ने नसणे, सकारात्मक दृष्टिकोन नसणे हे दृष्टिहिनतेपेक्षा मोठे दुर्भाग्य आहे.

थॉमस अल्वा एडिसनच्या कारखान्याला वयाच्या ६५ व्या वर्षी आग लागली आणि सर्व मालमत्ता जळून खाक झाली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, चला आयुष्यातील सर्व चुका जळून गेल्या, पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरुवात करूया. या घटनेनंतर सकारात्मक विचारांच्या ऊर्जेतून त्यांनी तीनच आठवड्यांत ग्रामोफोनचा शोध लावून उत्पादनाला सुरुवात केली. यशासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी असा सकारात्मक दृष्टिकोन हवा त्यानेच आयुष्य उन्नत होते. शेवटी एवढंच सांगावसं वाटत... ‘मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है। पंख होने से कुछ भी नही होता, होसलों से उड्डान होती है।’        

(लेखक प्रसिद्ध व्याख्याते आहेत.)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPuneपुणे