शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

Pitru Paksha 2020 : आज भरणी नक्षत्र... 'भरणी श्राद्ध' करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचं पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 10:21 AM

Pitru Paksha 2020 : पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते.

भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते. मृताच्या पहिल्या वर्षाच्या आत येणाऱ्या भाद्रपदातील भरणी नक्षत्रावर मृतादि तिघांना धरून श्राद्ध करावे. पितृपक्षात जर मृताचे भरणी श्राद्ध केले नाही तर त्याची प्रेतत्वातून मुक्ती कशी बरे होईल, असा सवालही शास्त्रकारांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे भरणी नक्षत्रावर सपिंड श्राद्ध न केले तर तो मृतात्मा प्रेतत्वापासून कसा मुक्त होईल, असे शास्त्रकारांचे म्हणणे असल्याचे वेदशास्त्र संपन्न मंगेशगुरुजी ठोसर यांनी सांगितले.

ज्यांना जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात, अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया, पितृगया, पुष्करतीर्थ, ब्रह्मकपाल इत्यादि तीर्थावरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते. तसेच ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गयादि तीर्थांवर श्राद्धे करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक क्षमता व वेळ यांच्या अभावी ते करता येणे शक्य नसल्यासही भरणी श्राद्ध करतात. दरवर्षी भरणी श्राद्ध करावे, असे शास्त्रकार सांगतात. वास्तविक पाहता पुरातन काळी पितृपक्षामध्ये सर्वच दिवस श्राद्ध करण्याचा प्रघात असल्यामुळे त्यात भरणी श्राद्ध होतच होते. परंतु कालौघात पितृपक्षात मृताच्या फक्त तिथीच्या दिवशीच श्राद्ध करण्याची प्रथा पडल्यामुळे भरणी श्राद्धाबाबत वेगळा विचार करणे भाग पडत आहे. भरणी श्राद्धात पिंडाचा निषेध सांगितलेला आहे. तो प्रथम वर्षानंतर दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी भरणी श्राद्धासंबंधी समजावा, असे शास्त्रकार सांगतात. भरणी श्राद्ध मृताच्या पहिल्या वर्षी करावे की दुसऱ्या वर्षीपासून करावे, याबाबत देशभरातील विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. अनेक ठिकाणी तर दरवर्षी भरणी श्राद्ध अवश्य करावे, परंतु पहिल्या वर्षी बिलकूलच करू नये, असे सांगितले जाते. तर काही ठिकाणी पहिल्या वर्षी अवश्य करावे व नंतर इच्छा असल्यास दरवर्षी करावे, असे म्हटले जाते. त्यामुळे सांप्रत हे भरणी श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये, याबाबत भाविकांनी देशकालानुसार निर्णय घ्यावा, असे सांगून ठेवलेले आहे.

काहींच्या मते तर भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघा नक्षत्रादि श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसºया वर्षीपासून करावीत, असे म्हणतात. नित्य तर्पणातदेखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये, असे म्हटले जाते.

श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा?

श्राद्ध तसेच पक्षाचा स्वयंपाक कोणी करावा, याबाबत शास्त्राने स्पष्टपणे सांगितलेले आहे. श्राद्धमंजिरी या पुस्तकात याचे सविस्तर विवेचन आलेले आहे. शक्य असेल तर श्राद्धकर्त्याने स्वत: हा स्वयंपाक करावा. ते शक्य नसेल तर त्याच्या पत्नीने करावा. तेही शक्य नसेल तर भावकीने, सजातीय, सदाचारी, स्रेही, मित्र, मातृ-पितृ वंशज यांनी करावा. तेही शक्य नसेल तर सौभाग्यवती, पुत्रवती महिला आदींकडून हा स्वयंपाक करावा, असे शास्त्राने सांगितलेले आहे.

ब्राह्मणांचे आसन कशाचे असावे?

श्राद्धातील बारीक-सारीक बाबींचेही शास्त्राने विवेचन केलेले आहे. देवस्थानी व पितृस्थानी भोजनाला बसणाºया ब्राह्मणांचे आसन कसे असावे, याबाबतही स्पष्टपणे सांगितलेले आहे. हे आसन रेशम, लोकर, लाकूड, कुशाचे असावे, असे म्हटले आहे. मात्र, हे आसन लोखंडाचे कदापिही नसावे, असे सांगितलेले आहे.

- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षAdhyatmikआध्यात्मिक