शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 20:48 IST

शब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस.

- धर्मराज हल्लाळेशब्दाला जागणारा माणूस. शब्द पाळणारा माणूस. शब्द म्हणजे प्रमाण असणारा माणूस. असा शब्दांना घट्ट धरून जगणारा माणूस समाजाच्या आदरस्थानी असतो. ह्यजान जायें पर वचन न जायेह्ण ही धारणा ज्याच्या ठायी असते, तो शब्दांवर पक्का असतो. तो शब्द फिरवत नाही. मग त्यासाठी आयुष्य पणाला लागले तरी चालेल. संत तुकाराम महाराज यांनीही आपल्या अभंगातून मानवी वृत्ती, प्रवृत्ती सांगितल्या आहेत.शब्द प्रहाराने समाजमन जागे केले आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसा बोलतो तसाच वागतो, त्याच्या पावलांचे वंदन केले पाहिजे. तसे वंदन करावीत अशी पाऊले अभावानेच दिसतात. खरे बोलणे, खरे वागणे हा अव्यवहारीपणा मानला जातो. याउलट जसे बोलू तसे वागू नये हाच जणू व्यवहार सांगितला जातो. मात्र अशा व्यवहाराने त्या व्यक्तीचे आयुष्य खोटेपणाच्या वर्तुळात फिरत राहते. आभासी जीवन वाट्याला येते. दुसऱ्याची फसवणूक करताना आपण स्वत:लाच फसवीत असतो. शब्द न पाळल्याने अप्रतिष्ठा वाट्याला येते. आपले सामाजिक मूल्य घसरते. हा माणूस शब्दाला जागत नाही. जे बोलतो त्याच्या उलट वागतो. कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, अशी दूषणे आपले व्यक्तिमत्त्व डागाळतात.जे बोलाल ते केलेच पाहिजे. उक्ती तशी कृती असलीच पाहिजे. ज्या गोष्टी आपण करू शकणार नाही त्या न बोललेल्या ब-या. शब्द जपून वापरले पाहिजेत. कारण शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुद्धा अन् शब्दच विझवितात आग शब्दांनी पेटलेल्या माणसांची. अर्थात आपले बोलणे समाजाच्या भल्याचे असावे. ख-याच्या बाजूने असावे. शब्दात मोठी ताकद आहे. ज्या शब्दांनी घरे, दारे, देश पेटतात त्याच शब्दांनी माणसांना शांतही करता येते. ही शब्दमहती जशी आहे तसे शब्दांना जागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जे करू शकू ते बोला. जे बोलले ते करा. आपल्यावर विसंबून असणाºयांना धोका झाला तर त्यांच्यासाठी तो एक वाईट अनुभव असतो. ज्याची ते पुनरावृत्ती करीत नाहीत. अर्थात ते पुन्हा कधीच आपल्यावर विसंबून राहत नाहीत, म्हणजेच विश्वास ठेवत नाहीत. ज्यामुळे आपण जवळचा माणूस गमावतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक