शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:20 IST

या भारत भूमित अनेक संत-महंत होऊन गेले आहेत; परंतु राष्ट्रसंत एकच झालेले आहेत, ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ...

या भारत भूमित अनेक संत-महंत होऊन गेले आहेत; परंतु राष्ट्रसंत एकच झालेले आहेत, ते म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होत. म्हणूनच स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन १९४९ ला महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली तेव्हापासून महाराजांच्या नावापुढे राष्ट्रसंत हे नाव प्रकाशात व प्रचारात आले आहे. अमरावती शहराजवळील यावली या गावी श्री बंडोजी अर्थात नामदेव गणेशपंत इंगळे- ठाकूर व मातोश्री मंजुळादेवी या दाम्पत्यांच्या पोटी ब्रह्ममुहूर्तावर ३0 एप्रिल १९0९ रोजी झालेल्या सुपुत्राचा जन्म म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होत. सोमवारी ५0 वी पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवी वर्षे सोहळा सर्वत्र संपन्न होत आहे.एकदा आपला मुलगा माणिकदेव यास मातोश्री मंजुळादेवी गुरुवर्य संत आडकोजी महाराजांच्या दर्शनाला वरखेडला घेऊन गेली असता, महाराजांनी माणिकदेवच्या तोंडात भाकरीचा तुकडा कोंबला व ‘तुकड्या तुकड्या’ म्हणून संबोधू लागलेत तेव्हापासून ‘तुकड्या’ हे नाव माणिकदेवांचे प्रचारात आले आहे. सन १९२१ ला सद्गुरु संत श्री आडकोजी महाराज शतायुषी होऊन त्यांचे महानिर्वाण झाले. त्यामुळे त्यांचे शिष्य असलेले संत तुकडोजी महाराजांना गुरुविरहाचा असह्य धक्का बसला. त्यांना अतोनात दु:ख झाले व ते या विरहात असताना पंढरीला निघून गेलेत. पंढरपूर येथील माता-पित्याची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिकाचा आदर्श घेऊन आपल्या मातोश्रीची सेवा स्वत: अखंडपणे करण्याचा निर्धार त्यांनी केला. तेव्हापासून ते आपल्या मातोश्रीची विशेष काळजी घेऊन त्यांची अहोरात्र सेवा केलेली आहे. आपल्या उदरनिर्वाहाकरिता शिवणकाम करून शेवटपर्यंत तिचा मनोभावे सांभाळ केला आहे.अवघ्या वयाच्या २0 व्या वर्षी सन १९२९ मध्ये महाराजांचा पहिला हिंदी भजनमालिका संग्रह प्रकाशित झाला आहे. सन १९३0 ला वैदर्भीय गोंडवनातील सत्याग्रह व १९३५ ला सालबडी येथील महायज्ञ आणि सन १९४१ ला ‘युवकांचा स्वतंत्र राष्ट्रधर्म शिक्षण वर्ग’ महाराजांनी घेऊन प्रत्येक दिवशी हजारो युवकांमध्ये आपल्या प्रभावी भजन-भाषणातून राष्ट्राबाबत भक्ती, प्रेम व निष्ठा जागृत केली आहे.सबके लिये खुला है, मंदिर यह हमारा।।आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी ।।देशी विदेशियोका मंदिर ये हमारा ।।सर्व, धर्म, पंथ, जाती पलीकडचे असलेले ईश्वराचे असणारे स्वरूप ते आपल्या रसाळ वाणीद्वारे भजनातून प्रगट करतात. महाराज आपल्या मनातील भावभक्तीला महत्त्व देतात. ते म्हणतात,मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव।देव अशाने, भेटायचा नाही हो ।देव बाजारचा भाजीपाला नाही हो ।।आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात,देवाचे देवत्व आहे ठायी ठायी ।मी तू गेल्याविना अनुभव नाही ।।महाराजांना माणसातील माणुसकी अभिप्रेत होती. म्हणून ते म्हणतात ‘माणूस द्या मज, माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला। प्रत्येक माणसात ईश्वरी तत्त्व असल्याचे महाराजांनी प्रतिपादन केले आहे.सन १९४२ च्या महात्मा गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी अपूर्व रंग भरला. तसेच १९४३ मध्ये ‘श्रीगुरुदेव’ मासिकाचा शुभारंभ केला आहे. लगेच ‘गुरुदेव सेवा मंडळाची’ स्थापना करून गावोगावी प्रचार व प्रसाराद्वारे असंख्य शाखा आपल्या राज्यात निर्माण केल्या आहेत. ज्याद्वारे ग्रामीण उद्योग वर्ग, व्यायाम वर्ग, आयुर्वेद वर्ग, महिलोन्नती वर्ग, रामधून, सामूहिक प्रार्थना, पंचमहोत्सव तसेच विविध स्पर्धा गावोगावी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने होऊ लागल्यात. गावागावांमधील संघटनेस त्यांनी महत्त्व देऊन त्याद्वारे ग्रामचा म्हणजेच गावांचा विकास साधण्यावर त्यांनी भर दिला असून, गावाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानला आहे.गावातील एक एक माणूस जर आपण जोडला तर संघटन मजबूत होऊन त्यावर गावाचा विकास साधता येतो, याकरिता गावामधील ‘त्यागी, निर्भय व उज्ज्वल चारित्र्य’ असणाºया व्यक्तीची निवड या गाव संघटनेमध्ये करावी, ज्याद्वारे विधायक, रचनात्मक कार्य संघटनेला करता येईल. त्यामुळे गावाची प्रगती होईल, असे महाराज म्हणतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भरपूर ग्रंथसंपदा असून, त्यांचे विपुल साहित्य हिंदी व मराठी भाषेत प्रसिद्ध आहे. त्यांची ग्रामगीता, गीताप्रसाद, सार्थ आनंदामृत, बोधामृत त्याचप्रमाणे मराठी भाषेत ११६0 भजने, २१0९ अभंग, १0 पोवाडे, ७७६ श्लोक, ५१४९ ओव्या, १६ मंगलाष्टके व हिंदी भाषेत २३६९ भजने, १७६६ बरखा, १५१७ सद्विचार, प्रार्थनाष्टकांचे ८२ श्लोक, १३ आरत्या, ४ स्वागतगीते त्याचप्रमाणे ६00 च्या वर हिंदी व मराठी भाषण लेख इ. प्रकाशित आहेत.गावांवरून देशाची परीक्षा केली जाते. गावाची उन्नती ही देशाच्या प्रगतीस कारणीभूत ठरते. आपले गाव जर भंगले तर गावाला पर्यायाने आपल्या देशाला अवदशा आल्याशिवाय राहणार नाही, असे महाराजांना वाटते. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानत असत. त्यामुळे समाजातील माणसामाणसांमध्ये परस्पर प्रेमाचे, सलोख्याचे, सहानुभूतीचे व सहकार्याचे वातावरण निर्माण व्हावे, असे त्यांना मनापासून वाटते. प्रत्येक व्यक्ती, गाव व राष्ट्र स्वावलंबी होऊन नवसमाज निर्मिती हे त्यांचे स्वप्न ग्रामगीतेतून साध्य होणार असल्याचा दृढ आत्मविश्वास त्यांचा आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य व कार्यकर्तृत्वाने समाजाला निरंतर जागृत/ प्रेरित करण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या साहित्यातील सहजवाणी, ओजस्वी भाषण तसेच रसाळ वाणीतील भजनातून समाजाचा उद्धार करण्याचा उपदेश केलेला आहे. या त्यांच्या साहित्यामधून समाजाला शिकविण्याचे महान कार्य घडले आहे. म्हणून आपला जीव त्यांना अर्पण केला तरीही त्यांच्या उपकाराची परतफेड समाजाकडून होऊ शकत नाही.

- डॉ. शांताराम बुटे, प्राचार्य 

टॅग्स :AkolaअकोलाRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजspiritualअध्यात्मिक