शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

आत्ता नको, नंतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 6:29 AM

- धनंजय जोशी गौतम बुद्धाने ‘नोबल एटफोल्ड पाथ’ म्हणजे ‘अष्टांगिक मार्ग’ शिकवला. त्याचे भाग कोठे? ते असे : सम्यक ...

- धनंजय जोशीगौतम बुद्धाने ‘नोबल एटफोल्ड पाथ’ म्हणजे ‘अष्टांगिक मार्ग’ शिकवला. त्याचे भाग कोठे? ते असे : सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. त्यामध्ये मला ‘सम्यक व्यायाम’ किंवा‘राइट एफर्ट’ जरा विचार करण्यासारखा वाटतो.झेन गुरु तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतात तेव्हा त्यात एक विलक्षण साधेपणा असतो. झेन गुरुंना ‘रोशी’पण म्हणतात जपानमध्ये. सुझुकी रोशी या झेन गुरुंचे पुस्तक ‘झेन माइंड, बिगिनर्स माइंड’ पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे. त्यांना एकदा त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला, ‘रोशी, राइट एफर्ट म्हणजे काय?’ रोशी म्हणाले, ‘राइट एफर्ट म्हणजे सकाळी ध्यानाच्या वेळी घड्याळाचा गजर झाला की एक सेकंदही न थांबता अंथरुणातून उठणे!’किती सुंदर उत्तर आहे! आपण काय करतो? गजर झाला की पहिला विचार - अरेरे, जरा अजून थोडा वेळ तरी झोपू दे! आणि एक वाईट (!) गोष्ट म्हणजे आपल्या घड्याळावर असलेले ‘स्नूझ’ बटण! त्याचा अर्थच मुळी ‘आत्ता नको, थोड्या वेळानं करू!’- पण होते काय? एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आपण हरवून बसतो. रोशी म्हणाले अजिबात थांबू नये!.. साधनेची वेळ ना? ‘राइट एफर्ट’चा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये कसा सामावून घ्यायचा त्याचे हे उत्तर.‘नाईकी’ ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. जगभर माहिती आहे ! त्या कंपनीचे बोधवाक्य किंवा स्लोगन आहे ‘जस्ट डू इट’ - न थांबता, एकही क्षण न घालवता. झेन गुरुंचे उत्तर आणि ‘जस्ट डू इट’ - दोन्ही एकच की वेगळे?आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे : उद्या पहाटे गजर वाजल्यावर तुम्ही काय करणार?