शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नामस्मरणच खरा यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 05:47 IST

भारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय.

-प्रा. शिवाजीराव भुकेलेभारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय. नामस्मरणाच्या भक्तीत जात, धर्म, वर्ण, प्रांत यापैकी कशाच्याही कुबड्या वापराव्या लागत नाहीत. स्वत:च्या पायावर, हातावर, मुख आणि मस्तकावर विश्वास ठेवून ईश्वरी भक्तीसमोर आपल्यास आहे तसे प्रस्तुत केले की, नामघोषाची गंगा धो-धो वाहू लागते. भावाचा खुंट जेव्हा नामस्मरणासारख्या साधनाने हलवून बळकट केला जातो, तेव्हा भक्तीच्या भूमीला सुख-दु:खाचे व हर्ष-विषादाचे तडे जात नाहीत म्हणून परमार्थाच्या क्षेत्रात नामस्मरणाची भक्ती जसे प्रारंभिक साधन आहे तसे अंतिम साध्यसुद्धा आहे. नामधारक भक्त नामस्मरणाच्या अव्यभिचारी भावनेवर दृढ राहतो. कारण त्याला माहीत असते पुढे नामभक्तीच्या माउलीने भक्त नावाच्या बालकाला आपली करंगळी दिली की, ज्ञान, वैराग्य, योग, शास्त्र, वेद, वेदांत हे आपोआप त्या भक्ती माउलीच्या पाठीमागे चालू लागतात. शिवाय साधनांच्या भाऊगर्दीत जेव्हा जीवन गुदमरू लागते तेव्हा आत्मसुखाचा आनंद आपोआपच दूर जाऊ लागतो. म्हणूनच तर नामस्मरणासारखे एकमेव साधन भक्तांच्या हाती देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,नाम जप यज्ञु तो परम । बाधु न शके स्नानादी कर्मेनामे पावन धर्मा धर्म । नाम परब्रह्म वेदार्थे।।नाम हाच या विश्वातील फुकाचा यज्ञ आहे. इतर याज्ञिक प्रक्रियेत वेळ, श्रम, धन तर खर्च होतेच; पण हाती मात्र काहीच लागत नाही. सोवळ्या-ओवळ्यांच्या भाऊगर्दीत कधी-कधी नामस्मरणाकडे दुर्लक्ष होऊन नको त्या कर्मकांडाला महत्त्व येते. खरे तर निरागस बालकांचे हास्य, चांदण्याचा पिठूर प्रकाश, चंद्रकिरणातून स्रवणारे अमृतकण, सूर्य नारायणाच्या सहस्रावधी किरणांतून मिळणारी ऊर्जा ही जशी निसर्गदत्त प्रक्रिया आहे तसे नामस्मरण आहे. नाम कुणाचेही घ्यावे, नाम कुणीही घ्यावे व नाम कोठेही घ्यावे, ते फक्त आंतरिक सद्भावाने आणि आत्यंतिक सहजतेने घ्यावे तेव्हा ते सद्भक्ताला द्यायचे ते फल योग्यवेळी देणारच. सचैल स्नान न करता भाकरी खाल्ली व पाणी प्याले तर भूक, तहान भागू शकत नाही, असे कधीच होऊ शकत नाही. तसे नामस्मरण घेणाऱ्यांच्या देहाची औपचारिकता महत्त्वाची नसून, त्याची भक्ती, भावना महत्त्वाची आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक