शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

भुके नाही अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 05:34 IST

खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

आपला देश तसा धर्मप्रवण आहे. इथे जेवढे धार्मिक सोहळे साजरे होतात, तेवढे जगाच्या पाठीवर कदाचित कोठेच होत नसतील. खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती. ज्याला माता-पित्यांच्या पायाचे चरणतीर्थ मिळते, त्याला इतर कुठल्याच तीर्थाची गरज नसते. हा आदर्शवाद एका बाजूला आपली बोथट होत चाललेली संवेदना आई-बापांनाच आपला वैरी मानू लागली आहे. हा आत्मघात आहे, जो कुटुंब व्यवस्थेचा कणाच मोडून टाकणारा आहे. अशा माता-पिताद्वेषी माणसांच्याविषयी संत नामदेव म्हणाले होते -जयाचे उदरी जन्माला जों नर । पीडी तया थोर सर्वकाळ ।मानीली अंतरी सखी जीवलग। आत्महत्या मग घात करी ।नामा म्हणे ऐसें पातकी चंडाळ बुडविले कुळ बेचाळीस। ज्यांच्या पोटी जन्म घ्यायचा, त्यांनाच एवढे पिडायचे की, बिचाऱ्या माता-पित्यांना या छळवणुकीपेक्षा मरण बरे वाटावे. अशा कुटुंबद्रोही दिवट्यांना संत नामदेवांनी चंडाळ म्हटले आहे. अशा नराधमास जन्म देण्यापेक्षा वांझोटे राहिलो असतो तर खूप बरे झाले असते अशी पश्चात्तापाची वेळ आज अनेक माता-पित्यांवर येत आहे. त्यामुळे घरे ओस पडत आहेत आणि वृद्धाश्रम ‘हाउसफुल्ल’ होत आहेत. आत्मा-परमात्म्याच्या मिलनाच्या गप्पा मारीत आहेत. आपल्या आई-बाबांना कडकडून भूक लागायची, तेव्हा त्यांना वेळेवर कोरभर भाकरी न देणारी मंडळी भौतिक ऐश्वर्याची सूज आल्यानंतर मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात जाऊन आई-बाबांच्या नावाने पिंंडदान करीत आहेत. त्यापेक्षा हा ‘पीळदार’ देह दिला, त्यांना जिवंतपणी अन्न, वस्त्र, निवाºयाचे छत्र आणि पुत्राचे वात्सल्य देऊ या ! नाहीतर तुकोबारायांनी म्हटलेच आहे -भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंंडदान ।हे तो चाळवा चाळवी । केले आपणीच जेवीं ।नैवेद्याचा आळ । वेचे ठाकनी सकळ ।तुका म्हणे जड । मज न राखावे दगड ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक