शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

निवृत्तीसाठी सोपान हवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:23 AM

- इंद्रजित देशमुखकालचा दिवे घाटाचा अवघड टप्पा पार केल्यानंतर माउली आज दिवसभर सोपानकाकांच्या सासवड नगरीत विसावणार आहेत. तर तुकोबाराय आज लोणीकाळभोरहून निघून ऊरळीकांचनमार्गे यवत मुक्कामी विसावणार आहेत.आज सासवड नगरीत माउली आणि सोबतचे वैष्णव सोपानकाकांशी जणू भक्तीप्रेमाचं सुख आणि त्याची अनुभूती याबाबत हितगुज करणार आहेत. मी ऐकलेली एक लाघवी गोष्ट अशी ...

- इंद्रजित देशमुखकालचा दिवे घाटाचा अवघड टप्पा पार केल्यानंतर माउली आज दिवसभर सोपानकाकांच्या सासवड नगरीत विसावणार आहेत. तर तुकोबाराय आज लोणीकाळभोरहून निघून ऊरळीकांचनमार्गे यवत मुक्कामी विसावणार आहेत.आज सासवड नगरीत माउली आणि सोबतचे वैष्णव सोपानकाकांशी जणू भक्तीप्रेमाचं सुख आणि त्याची अनुभूती याबाबत हितगुज करणार आहेत. मी ऐकलेली एक लाघवी गोष्ट अशी आहे की, या चारही लहान भावंडांना आणि त्यांच्या आई-वडिलांना समाज खूप त्रास देत होता. अगदी हीन दर्जाची वागणूक या सहा दिव्य जिवांना मिळत होती. आळंदीत सिद्धबेटावरील चंद्रमौळी झोपडीत हे सर्वजण सहन करीत रहात होते. या सगळ्यातून थोडातरी विसावा मिळावा म्हणून विठ्ठलपंतांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायचे ठरविले आणि अनवाणी पायाने जगाच्या पायाखाली फुलांचे अंथरून पसरू पाहणारी ही मंडळी प्रवास करऊ लागली. आग ओकणारा सूर्य डोक्यावर घेत पोटात दीर्घ भुकेच्या अस्तित्वाला धारण करत या साऱ्या दु:खाला ओठाच्या आत लपवत तो खडतर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा प्रवास सुरू होता. या प्रवासात सोपानकाकांचे पाय उन्हाने पोळू लागले. पाय खूपच पोळत होते तरी कसलीच तक्रार न करणाºया सोपानकाकांची ही वेदना निवृत्तीनाथदादांना जाणवली. सोपानकाकांना स्वत:च्या पाठीवर घेऊन ते चालू लागले. या प्रसंगातील लक्षार्थ आम्हाला असं सूचवितो की, निवृत्तीसाठी सोपान असावाच लागतो. तरच आम्हाला हा भवसागरविषयक फेरा निर्वेधपणे पार पाडता येतो. आणि निवृत्त होता येतं. या दोघांचा समन्वय नसेल तर आम्हाला प्रवृत्ती आणि आवृत्ती यातच अडकावं लागतं. इथं निवृत्त होणं याचा अर्थ ‘सकळ सांडुनि वना गेला’ असं नाही, तर वारकरी परंपरेनुसार ‘मी’ आणि ‘माझी’ ऐसी आठवण अंत:करणातून काढून टाकून‘मने वाचा देहे । जैसा जो व्यापारू होये ।।तो मी करितु आहे । ऐसे न म्हणा ।।अशा भूमिकेत राहणे होय. पण हे कधी जमू शकते; सोपान सोबत असतील तरच. सोपानदेव म्हणजे सोपेपणाने परमार्थ कसा साधावा, याचा निरंतर वस्तुपाठ. साधेपणाच्या साधनेबद्दल सोपानकाका सांगतात -‘आणिक ऐके गा दुता।जेथे रामनाम कथा।तेथे करद्वय जोडोनि हनुमंता ।सदा सन्मुख असिजे ।।रामनामी चाले घोषु ।तो धन्य देशु धन्य दिवसु ।।प्रेमकला महाउल्हासु ।जगलीवासु विनवितुसे ।।दिंड्या पताका टाळ घोळ नामे सुरंग ।तेथे आपण पांडुरंग भक्तासंगे नाचत ।।तया भक्ता तिष्ठती मुक्ती ।पुरुषार्थ तरी नामे किर्ती ।।रामनामी तया तृप्ती।ऐसे त्रिजगती यमु सांगतु।।जिथं रामनामकथा घोष सुरू असतो. तिथे भक्त शिरोमणी हनुमंतराय हात जोडून उभे असतात. ज्या देशात, ज्या दिवशी हा घोष सुरू असतो तो देश आणि तो दिवस प्रेमाने भारलेला असतो. आनंदाचा उत्सव साजरा करतो. हा परमार्थ साधा आहे. कारण इथे दिंड्या पताका, टाळ, मृदंग आणि नामाच्या समवेत स्वत: देव नाचत असतो. इतर साधनेत नाना खटपटी असतात आणि मुक्तीसाठी तिष्ठत उभं रहावे लागते. वारकरी संप्रदाय हा मुक्तीला कधीच परमप्रयोजन म्हणून स्वीकारत नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ‘न लगे मुक्ती’ पुरुषार्थ, किर्ती आणि तृप्ती यासाठी सामान्यांना खूप धडपडावं लागतं. तरीही त्याच्या प्राप्तीची खात्री नसते. इथं मात्र ही दिसायला सामान्य असणारी मात्र अनुभूतीने परमोच्च असणारी ही साधना करणाºया वारकºयांसाठी पुरुषार्थ, किर्ती आणि तृप्ती तिष्ठत असतात.मुळातच ‘सकलांसी येथे आहे अधिकार’ अशा सर्व उपयोगी असणाºया सुखसाधनेचा अंगीकार केल्यानंतरज्या नामे शंकर निवाला ।गणिका अजामेळ पद पावला ।अहिल्याचा शाप दग्धजाला ।तोचि पान्हा दिधला पांडुरंगे ।।ज्या साधनाने भगवान शंकर शांत झाले. गणिका आजा मेळे यांना उत्तम परमार्थिक पदाची प्राप्ती झाली. शापामुळे अहिल्येच्या जीवनात आलेली व्यथा संपली आणि ती दिव्य झाली.हे सर्व पटवून सांगताना ‘हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा’ या माउली ज्ञानेश्वरांच्या वचनानेच समर्थन करतात. सासवडनगरी सोडताना धाकल्याचा निरोप घेऊन पुढील वाट चालताना पाऊले जड होऊनच पुढे सरकतील, हे मात्र निश्चित !‘तुका म्हणे हे तो आहे तया ठावे ।जिही एक्या भावे जाणितले ।।(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)