शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र : भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील एक कृषी लोकोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:12 IST

आध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ जरी नवरात्राशी जोडले असले तरी प्राचीन काळापासून भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील तो एक कृषी लोकोत्सव आहे.

- डॉ. रामचंद्र देखणेआध्यात्मिक, पौराणिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ जरी नवरात्राशी जोडले असले तरी प्राचीन काळापासून भारतात नांदणा-या कृषिप्रधान संस्कृतीतील तो एक कृषी लोकोत्सव आहे. घटस्थापनेच्या दिवशी एका परडीमध्ये आपल्या शिवारातील वावराची माती टाकून त्यात विविध प्रकारचे धान्य टाकले जाते. त्यावर घट ठेवून त्यात पाणी भरले जाते. नऊ दिवसांत धान्याचे अंकुर मोठे होतात. दसºयाच्या दिवशी दसºयाचा तुरा म्हणून ते देवाला वाहिले जातात आणि टोपीवर, पागोट्यावर अभिमानाने अडकविले जातात.घट बसविण्याच्या या धार्मिक कृत्यामागील कृषिप्रक्रियेची घटना महत्त्चाची आहे. घटाच्या खाली ठेवलेली परडी हे एक शेत असते. मातीची परीक्षा घेण्यासाठी आपल्याच शिवारातील वावरी त्यात टाकली जाते.नांगराच्या फाळाने जमीन नांगरल्यानंतर जसे फराट तयार होतात तसे त्या परडीतल्या मातीवर उभ्या आडव्या नऊ रेघा मारल्या जातात. प्रत्येक रेषेवर एक याप्रमाणे नऊ रेघांवर नऊ प्रकारचे धान्य टाकले जाते. या पेरलेल्या धान्याला घटातल्या पाण्याने ओलावा मिळतो. या कृत्रिम शेताभोवती हवा खेळती राहावी म्हणून सतत दिवा लावला जातो. त्या दिव्याच्या उष्णतेने तेथील हवा विरळ होऊन वर जाते आणि त्या हवेची जागा बाहेरील शुद्ध हवा घेते.गोडेतेलाच्या दिव्याने आजूबाजूचे जंतूही मरून जातात. असे काळजीपूर्वक नऊ दिवस केल्यानंतर कोणते धान्य सकस रूपात उगवले आहे, हे पाहून पुढील वर्षी आपल्या शिवारात कोणते धान्य चांगले येऊ शकते, याचा अंदाज घेतला जात असे. म्हणजेच नवरात्रातील घटस्थापना ही शिवारातील माती, धान्याचे बी, येणारे पीकपाणी याचा अंदाज घेणारी एक छोटी कृषी प्रयोगशाळाच होती. आज नवरात्र उत्सवातील हा कृषिसंदर्भ आणि त्याचे स्वरुप लोप पावले आहे. एक धार्मिक क्रियाविधी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.एकूणच शारदीय नवरात्र उत्सवाचे वेगवेगळे पदर आहेत. वेगवेगळे संदर्भ आहेत. विविधांगी रूप आणि रूपक त्यातून व्यक्त होत आहे. असुरांच्या विनाशाचा, सत् प्रवृत्तीच्या संवर्धनाचा हा उत्सव आहे. सांस्कृतिक जीवनात या उत्सवाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे.

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७