शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

नवरसी भरवी सागरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:13 IST

ज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आ

- डॉ. रामचंद्र देखणेज्ञानेश्वरमाऊली सांगतात की, माझ्या जीवनात शब्दाइतके मोठेपण कशाला नाही. ‘अमृताचेही पैजा जिंंके’ ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वरमाऊली शब्दांच्या सामर्थ्यावर निष्ठा ठेवूनच करतात. शब्दानेच परमात्म्यालाही जाणणार आहे. जाणलेला परमात्मा लोकांसमोर उभा करणार आहे आणि शब्दानेच लोकसंवादही साधणार आहे.अनुभव घेणे आणि अनुभव व्यक्त करणे हे साहित्य होय. अंतर्मनाने बाह्यमनाशी केलेला संवाद म्हणजे साहित्य होय. पण भावानुभूतीचा आत्मसंवाद म्हणजे कविता होय. कवी कवितेतून एकीकडे रस निर्माण करून इतरांना आनंद देत असतो तर दुसरीकडे स्वत:च्या मनाशी संवाद करून आपणही आनंद घेत असतो. आपले काव्य कसे असावे याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात...नवरसी भरवी सागरू।करवी उचित रत्नांचे आगरु।भावार्थाचे गिरीवरू।निपजवी माये।माझ्या काव्यात नवरसांचा सहजसुंदर शिरकाव होऊ दे. शब्दरत्नांचे आगर लाभू दे आणि भावार्थाचे गिरीवर त्यातून उभे राहू देत. काव्याची व्याख्या करताना विश्वनाथाने म्हटले आहे.‘वाक्यं रसात्मकं काव्यम्।’ज्यात नवरसांपैकी एक किंवा अनेक रस असतील त्याला काव्य म्हणावे. काव्यातील मुख्य तत्त्व किंवा काव्याचा प्राण ‘रस’ हाच होय. शब्दांना जे काव्यत्व येते ते रसांमुळेच. ‘रस्यते इति रस:’ ज्याचा आपण आस्वाद घेतो किंवा आवडीने चाखतो तो रस होय. काव्यशास्त्रवेत्यांनी १. शृंगार, २. हास्य, ३. करुण, ४. रौद्र, ५. वीर, ६. भयानक, ७. बीभत्स आणि ८. अद्भुत असे आठ रस सांगितले आहेत. निरनिराळ्या पंडितांनी त्यात शांत, भक्ती किंवा प्रेयान यापैकी रसाला घालून ‘नवरस’ ही संकल्पना मांडली आहे. ज्ञानदेवादी संतपरंपरेने वरील आठ रसांबरोबर ‘शांत’ रसालाही काव्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे शांत रसाचे निवासस्थान.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,जेथ शांत रसाचिया घराअद्भुत आला आहे पाहुणेरा।ज्ञानेश्वरीचा मूळ रस हा शांत रस आहे. अद्भुत रस हा त्याच्या घरी आलेला पाहुणा आहे. नवरसात शांतरस हा कळसावर शोभतो हे निश्चित.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक