शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाथ म्हणजे ज्ञानवैराग्याचे भांडार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 02:43 IST

‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालिदल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामाने कशी खोड मोडली, याचे सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले.

- शैलजा भा. शेवडेभजा हो भजा माझ्या एकनाथासी,त्रिकाळी श्रीदत्तात्रेयदर्शन ज्यासी,प्रतिष्ठान, अधिष्ठान मान्य सर्वांसी,प्रकट परब्रह्म भानुदासाचे वंशी ।मुक्तेश्वरांनी संत एकनाथांचे किती सुंदर वर्णन केले आहे. नाथ म्हणजे शांतिब्रह्म. करुणेचा अवतार. नाथ म्हणजे सद्गुरूचा महिमा. नाथ म्हणजे गुरुभक्ती. नाथ म्हणजे भागवत. नाथ म्हणजे ज्यांच्या घरी प्रत्यक्ष कमलापती श्रीखंड्याच्या रूपात ज्यांच्या घरी पाणी भरत होते, अशी विभूती. नाथ म्हणजे भावार्थ रामायण. नाथ म्हणजे सद्गुरू भक्तीचा शृंगार. नाथ म्हणजे ज्ञानवैराग्याचे भांडार, नाथ म्हणजे सच्चिदानंद एकाकार.‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची निर्मिती. परकीय आक्रमणामुळे हवालिदल झालेल्या, स्वत्व विसरून गेलेल्या लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण करण्यासाठी दुष्ट रावणाची रामाने कशी खोड मोडली, याचे सकस वर्णन करून नाथांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. या दोन ग्रंथांशिवाय नाथांनी शुकाष्टक, रुक्मिणी स्वयंवर, आनंदलहरी, गीतासार, हस्तामलक, स्वात्मसुख गाथा असे एकापेक्षा एक लोकप्रिय ग्रंथ लिहिले. गाथेमध्ये अभंग, भारूड, गुरुस्तुती असे अनेक प्रकार आलेले आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार केला, तर नाथांनी लिहिलेल्या एकंदर पदांची संख्या जवळजवळ ७५ हजार एवढी प्रचंड होते. यावरून नाथांच्या प्रगल्भ प्रतिभेची कल्पना येते. नाथांनी भागवतातील एकादश स्कंध मराठीत ओवी रूपात लिहिला, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली, पण नाथांनी त्यांना उत्तर दिले,संस्कृत भाषा देवे निर्मिली, प्राकृत का ती, चोरे रचिली.वारकरी संप्रदायात भागवताची पारायणे केली जातात.नाथांसारखे महात्मे अठरा जातीचे, सर्व लोकांचे धर्मगुरू.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक