शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

'मनाला जाणणे म्हणजे परमात्म्याला जाणणे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 12:27 IST

कुठलीही गोष्ट मनावरच अवलंबून आहे. आपल्याला साधे कुणाचे काही ऐकून घ्यायचे असेल तरीही कानासोबत मन असेल तरच ऐकू येते. डोळ्यांसोबत मन असले तर डोळ्यांनी पाहिलेली वस्तू मनात ठसवू शकतात.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजकुठलीही गोष्ट मनावरच अवलंबून आहे. आपल्याला साधे कुणाचे काही ऐकून घ्यायचे असेल तरीही कानासोबत मन असेल तरच ऐकू येते. डोळ्यांसोबत मन असले तर डोळ्यांनी पाहिलेली वस्तू मनात ठसवू शकतात. कान, डोळे यांच्यासोबतही मनच असते. मन सात्त्विक, राजसिक व नामसिक असते का? मनावरूनच मनुष्य सात्त्विक, राजसिक, नामसिक आहे याची ओळख होते. त्रिगुणात्मकरूपी मायेला जरी सोडवायचे असले तरी ‘मनाची’ महत्त्वाची भूमिका असते. मनाला जाणणे म्हणजे परमात्म्याला जाणण्याप्रमाणे होय. परमात्मा दिसत नाही, बोलत नाही; पण कार्य करत राहतो. तसेच मन आहे. न दिसता, न बोलता ते काम करते. मनामुळेच सृष्टीचा विस्तार झाला. प्रवृत्ती-निवृत्ती या दोन्ही मनावरच अवलंबून असतात. सूर-असुर-मुर्ख-अधम या लोकांची ओळखही त्यांच्या मनावरूनच ठरते. देवता-भक्त-भगवान यांचाही विचार मनावरच आहे.

अहंमत्व-ममत्व याची जाणीवही मनच करते. दु:ख-शोक-आनंद-आत्महित-परहित या सगळ्यांची ओळख मनावरूनच होते. जो जो भक्त ज्या ज्या देवतेची उपासना करतो, त्याच्या मनाला भावणाऱ्या स्वरूपाचे तो वर्णन करतो. त्यालाच इष्टदेव समजून पूजा करतो. त्या त्या स्वरूपावर त्या भक्तांची श्रद्धा दृढ होते ती मनामुळेच! जिकडे पाहिले तिकडे मनाचे कार्य आहे. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला की त्याच्या आत-बाहेर पाणीच असते त्याप्रमाणे सर्वकाही मनाचा खेळ आहे. संपूर्ण विश्व मनाची क्रीडा आहे. त्याच्यानुसार अनुभवरूपी रसाचा त्यात भाव ओतलेला असतो. ज्याच्या अनुभवरूपी भांडारात मनाचा खेळ लक्षात आला तर तो महान होय. विवेक-अविवेकाची ओळख मनच करत असते. या जगात जितके प्राणी आहेत त्या सर्वांचे कार्य ‘मन’च करत असते. आशा-निराशा-इच्छा-द्वेष-दंभ-अहंकार हे सगळे मनानुसार ठरते. या सृष्टीतत्त्वात जे जे काही घडते त्या सर्वांना कारणीभूत ‘मन’ आहे. ब्रह्मरसाचा अनुभव घ्यायचा असला तरी तो मनाच्या चांगुलपणावरच आहे. कर्माच्या सर्व प्रयोजनाला कारणीभूत ‘मन’ असते. म्हणून मनोरूपी बीज चांगले पेरा फळे आपोआप चांगले येतील.

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक