शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

ऊठ अर्जुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 05:18 IST

रणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्याचे मन करुणेने व्याप्त झाले होते. डोळे आसवांनी भरले होते. तो व्याकूळ दिसत होता.

- शैलजा शेवडेरणांगणावर दु:खाने उद्विग्न मन झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. त्याचे मन करुणेने व्याप्त झाले होते. डोळे आसवांनी भरले होते. तो व्याकूळ दिसत होता. तेव्हा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन म्हणाले,ऊठ अर्जुना, उचल शस्त्र अन् तयार हो लढण्या,टाकून देऊन षंढपणा, चल शत्रूस रे भिडण्या ।परंतपा तुज शोभत नाही, रणांगणी हे होणे विव्हल,कोठून आले मनात तुझिया, दुष्कीर्तीकर दुबळे कश्मल ।खेद करसी अनुचिताचा, आव आणसी पांडित्याचा,प्राण कुणाचे जावो राहो, विवेकी शोक न करती त्याचा ।बाल्य, यौवन जरा अवस्था, जीवात्म्याला या देही,तसाच पुढती देह दुसरा, जाणत्यास भ्रांती नाही ।जुनाट वस्त्रे टाकून देऊन, मनुष्य घाली नवीन वसने,जीर्ण शरीरा तसेच त्यागून, आत्मा घेतो नवीन शरीरेजन्मरहित हा नित्य असे, क्षयरहित अविनाशी असे,जाणतो जो पुरुष असे, कोण मारील कोणास कसे?तुटतो ना शस्त्राने आत्मा, जळतो ना अग्नीने आत्मा,भिजतो ना पाण्याने आत्मा, सुकतो ना वायूने आत्मा ।अव्यक्त, अचिंत्य, अविकारी आत्मा, अनादी शाश्वत शुद्ध असे, जाणून घेऊन असे अर्जुना, शोक करणे योग्य नसे ।जन्म ज्यास मृत्यू त्याला, मृतास निश्चित जन्म असे,अटळ या गोष्टीकरिता, शोक करणे योग्य नसे ।देहामध्ये जो जीवात्मा, तो सर्वदा अवध्य असे,कुणा प्राण्यास्तव उगाच हा मग, शोक करणे योग्य नसे ।आज इथे या रणभूमीवर, शोक निरर्थक मृत्यूचा,क्षात्रधर्म हा तुझा सांगतो, मार्ग हितकर लढण्याचा ।समजतील भित्रा, पळपुटा, करशील ना तू युद्ध हे जर,दुष्कीर्ती मग तुझी निरंतर, मरणाहून जी अति भयंकर ।जिंकलेस जर, पृथ्वी भोगशील, मृत्यू पावला,स्वर्ग पावशील, म्हणून अर्जुना, युद्धाचा रे निश्चय करूनी, उठ तू चल ।' म्हणूनच भगवद्गीता मंत्ररूप आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक