शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 19:59 IST

अध्यात्म शास्त्रात जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाचा आणि  जीवाचा अनादी काळापासून संबंध आहे.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) 

अध्यात्म शास्त्रात जीव हा ईश्वराचाच अंश आहे. देवाचा आणि  जीवाचा अनादी काळापासून संबंध आहे. देव जसा सूक्ष्म तसा जीव देखील सूक्ष्म आहे. देव जसा दिसत नाही, तसा जीव देखील दिसत नाही. देव जसा अविनाशी तसा जीव देखील अविनाशी. देव जसा चैतन्यमय, तसा जीव देखील चैतन्यमयच.. संत तुलसीदासजी वर्णन करतात -ईश्वर अंश जीव अविनाशी..चेतन अमल सहज सुखराशी..!मनुष्य देहाला जे महत्त्व प्राप्त झाले ते जीवामुळेच झाले. या शरीरावर फक्त जीवाचीच सत्ता आहे. तुकाराम महाराज म्हणतात  हात पाय दिसे शरीर चालता..नाव भेद सत्ता जीवाची ती..!असा हा जीव भगवंताचा अंश असला तरी अविद्येमुळे व मायाजाळी गुरफटल्यामुळे भगवंतापासून विन्मुख झाला. मानव देह मिळाल्यानंतर सर्व प्रथम कोणते कर्म करावयाचे तर, जीवाला भगवत् सन्मुख करण्याचे. समर्थ रामदास स्वामी म्हणतातसांगा नरदेह जोडले आणि परमार्थ बुध्दी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळी..!माया ही जीवाला भगवंतापासून विन्मुख करते. जीवाला उद्वीग्न करते. माया ही छायेसारखी आहे. छायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. सूर्याच्या विरूद्ध दिशेला तोंड करून चाललो तर छायेचा अनुभव येतो. छायेच्या अनुभूतीचे कारण जशी सूर्याची विन्मुखता तसेच मायेच्या अनुभूतीचे कारण भगवंताची विन्मुखता. त्यासाठी माया निर्मूलनाचा उपाय म्हणजे फक्त भगवत् सन्मुखता. अशी देव सन्मुखता प्राप्त होण्यासाठी देह बुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धीशी ऐक्य होण्याची गरज आहे. आत्माराम ग्रंथात समर्थ रामदास स्वामी म्हणतात -अहं ऐसे जे स्फुरणतेचिं मायेचे लक्षणतयें मायेपासून त्रिगुणगुणापासून भूतेंअज्ञानामुळे, अविद्येमुळे जीवाला दु:ख प्राप्त होते. देह बुद्धीने केलेली कर्मेच जन्म मरणास कारण ठरतात. आत्मबुद्धीने केलेली कर्मे मोक्षपदाला नेतात. मानवी देहाला येऊन अशी साधना करावी की या जन्म मरणाच्या भवबंधनातून मुक्त होता येईल..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक