शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

श्रवण होता पालटे । पूर्वगुण आपुला ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 3:43 PM

काही लोक ऐकतात आणि ते इतरांना कसं लागू पडतं याविषयी चर्चा करतात म्हणून संत साहित्य हा आरसा आहे ते  इतरांवरती उगारावयाचे शस्त्र नाही. श्रवणानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यानंतर आत्मपरिवर्तनाचीसुद्धा..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )   आज आपण अध्यात्माच्या बैठकीची सुरुवात किंवा पाया काय आहे..? हे बघणार आहोत. श्रीमद् भागवतकार म्हणतात -

श्रवणं कीर्तनं विष्णो:स्मरणं पादसेवनं ।अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् ॥

श्रवण ही अध्यात्माची सुरुवात किंवा पाया असल्यामुळे पायाच कच्चा असल्यास ईमारत कोसळण्याची शक्यता असते. म्हणून श्रवण कसे असावे.? श्री समर्थ रामदास स्वामी  म्हणतात -

रात्रंदिवस करि श्रवण । न सांडि आपुले अवगुण ।स्वहित आपले आपण । नेणे तो एक पढतमूर्ख ॥

म्हणजे, श्रवण ही नुसती सात्त्विक करमणूक नसावी किंवा व्यसनाप्रमाणे तो एक सवयीचा भागही नसावा तर श्रवणामध्ये जीवन परिवर्तनाची तळमळ हवी आणि या श्रवणाचा उपयोग स्वतःतील बदलासाठी व्हावा. श्रवणापूर्वीचा मी आणि श्रवणानंतरचा मी यांत काहीच बदल नसेल तर आपण श्रवण केलं म्हणजे काय केलं..? हा प्रश्न पडतो. काही लोक ऐकतात आणि ते इतरांना कसं लागू पडतं याविषयी चर्चा करतात म्हणून संत साहित्य हा आरसा आहे ते  इतरांवरती उगारावयाचे शस्त्र नाही. श्रवणानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यानंतर आत्मपरिवर्तनाचीसुद्धा.

एकदा अकबराच्या दरबारात एका मूर्तिकाराने तीन अगदी हुबेहूब सारख्या मूर्ती आणल्या आणि बादशहाला दाखवल्या. आणि तो म्हणाला यातील कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे.? हे सांगा. त्या मूर्तींमधील फरक कोणालाही जाणवला नाही तेव्हा बिरबलापर्यंत ही गोष्ट आली. त्याने निरिक्षण केले आणि  त्याच्या लक्षात आले की, एका मूर्तीच्या दोन्ही कानांना छिद्र होती, दुसऱ्या मूर्तीच्या एकाच कानाला छिद्र होतं आणि तोंड उघडं होतं, तिसऱ्या मूर्तीच्या एका कानाला छिद्र होतं आणि ह्रदयाजवळ छिद्र होतं. यावरून बिरबलाने सांगितले, या तीन मूर्ती तीन प्रकारच्या श्रोत्यांचे प्रतिनिधित्व करतात. पहिली मूर्ती एका कानानं ऐकणं आणि दुसऱ्या कानानं सोडून देणं, मनावर काहीच घ्यायचं नाही. दुसरी मूर्ती ऐकणं किती चांगलं होतं हे इतरांना सांगतात, स्वत:च्या ह्रदयात काहीच परिवर्तन करीत नाहीत आणि तिसरी मूर्ती ऐकतात आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात म्हणून फक्त ग्रंथांची किंवा वक्त्याची स्तुती करुन जीवन बदलत नाही तर आपल्या वागण्यात बदल व्हावा लागतो. हे असं श्रवण घडण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्य असावे लागते. संत म्हणतात -

बहुत सुकृताची जोडी । म्हणून विठ्ठली आवडी ॥

पूर्वी पंप मारायचे स्टोव्ह असायचे, पेटलेला स्टोव्ह बंद करुन पुन्हा सुरु करताना एका पंपात पेटायचा कारण बर्नर तापलेलं असायचं तसं पूर्वपुण्याचं बर्नर तापलेलं असलं तर श्रवणाच्या एकाच पंपाने आपल्यात परिवर्तन होईल. विषयाच्या काळजीनं खराब झालेलं बर्नर श्रवणाने स्वच्छ होईल पण  त्यासाठी त्या श्रवणात तळमळ हवी. आता आपण म्हणाल, श्रवण करु पण फायदा काय.? फलश्रुती काय.? श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

श्रवणे आशंका फिटे । श्रवणे संशय तुटे ।श्रवण होता पालटे । पूर्वगुण आपुला ॥

श्रवण हा संस्कार आहे. श्रवणामुळे कान आणि मन दोन्हीही तयार होते. जसे -

सेविलेची सेवावे अन्न । घेतलेचि घ्यावे जीवन ।तैसे श्रवण मनन । केलेची करावे ॥

ज्याप्रमाणे आपण दररोज घर झाडतो, स्नान करतो, कपडे धुतो, भांडी घासतो ज्यामुळे आपलं घर स्वच्छ राहतं, शरीर स्वच्छ राहतं त्याप्रमाणे श्रवणामुळे मन स्वच्छ होतं. श्रवण म्हणजे आपल्या निरोगी मनाचा पाया आहे. आज आपण एकमेकांविषयी गैरसमज झालेले पाहतो. क्रोधातून घडलेल्या घटना, द्वेष, मनाची अस्थिरता ही सगळी मानसिक उपासमारीची लक्षणं आहेत. आज आपण चांगलं ऐकणं विसरलो त्यामुळे आपली मानसिकता अस्थिर झाली. श्रवणाची सोय नसेल तर कमीत कमी संत साहित्याचे किंवा आध्यात्मिक साहित्याचे वाचन तरी शांतचित्ताने करावयांस हवे. आता श्रवण कसे करावे..? हे पुढील लेखांकात पाहूया..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार असून त्यांचा भ्रमणध्वनी 8793030303 आहे )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक