शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

जीवनातील सावधानता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 5:07 PM

प्रपंचावरील माया भगवंताला अर्पण केल्यावर भगवंत भेटतोच. श्रीसमर्थांनी सावधान शब्दाचा अर्थ ओळखला होता. सा म्हणजे साधूता, व म्हणजे वर्तमानकाळाचा वेध घेण्याची शक्ती, धा म्हणजे धारणा पक्क्या होणे आणि न म्हणजे नम्रता. सावधान म्हणजे नेमके काय ? हे लक्षात घेता आपल्या सर्वांना सावध करण्याचे कार्य श्रीसमर्थ करतात, याची जाणिव होते.

जीवनातील सावधानता———विलास गरवारे——-प्रपंचावरील माया भगवंताला अर्पण केल्यावर भगवंत भेटतोच. श्रीसमर्थांनी सावधान शब्दाचा अर्थ ओळखला होता. सा म्हणजे साधूता, व म्हणजे वर्तमानकाळाचा वेध घेण्याची शक्ती, धा म्हणजे धारणा पक्क्या होणे आणि न म्हणजे नम्रता. सावधान म्हणजे नेमके काय ? हे लक्षात घेता आपल्या सर्वांना सावध करण्याचे कार्य श्रीसमर्थ करतात, याची जाणिव होते.स्वत: प्रपंच न करता श्रीसमर्थांनी आधी प्रपंच करावा नेटका हे सांगितले. श्रीसमर्थांसह कोणत्याही संतांनी प्रपंच सोडा, असे सांगितले नाही. प्रपंच नेटका केल्यानंतर मन प्रपंचामधून निघण्यासाठी त्यास मना सज्जना भक्तिपंथेचि जावे, असे श्रीसमर्थ सांगतात. प्रपंच करून परमार्थ करताना कर्तेपणा श्रीरामाला द्यावा. तोच सर्व भार वाहतो, या श्रध्देने प्रपंच केल्यास परमार्थ सहज प्राप्त होतो. संत गोरोबा कुंभार यांनी प्रपंचातील दु:खाचा सर्व भार पांडुरंगावर सोपवला. त्या दृढ निष्ठेमुळे भगवंत स्वत: गोरोबाकाकांचे घरी दास म्हणून राहिले. आपले मन प्रपंचामधून निघत नाही म्हणून परमेश्वरचरणी लीन होत नाही. मनाला एकदा भगवंताच्या नामाचा अनुभव आला की ते बदलत नाही. त्यासाठी सतत नामचिंतन करण्याचा संदेश ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिला आहेच. भजनात आणि नामात समाधानच मिळते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवंताने ठेवले तसेच रहावे. चित्ती असू द्यावे समाधान असे सांगितले आहे. रवीला दोरी लावून ताक घुसळण्याच्या काळात गृहिणी आरोग्यदृष्ट्या तंदुरूस्त असायच्या. आता झटपट आवरण्यासाठी मिक्सर आला. कामे लवकर आटोपत असली तरी खास वेळ काढून व्यायाम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. श्रीसमर्थांसारखे सद्गुरू मिळणे व त्यांची कृपा लाभणे हे फार भाग्याचे.