शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

राष्ट्रसंतांनी पत्रे  : प्रेमभक्तीचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:41 IST

हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल.

प्रिय मित्रसंत मीराबाईबद्दल आपण विचारले की तिला प्रेमभक्ती कशी प्राप्त झाली? आपल्या या प्रश्नासंबंधीचे माझे विचार मी आपणास कळवीत आहे. हे बघा! भक्तीसाठी राणीपदाची, ऐश्वर्याची गरज नाही. कोणतीही महिला आपल्या शुद्ध अंत:करणाने प्रभुभक्तीत तदाकार झाली तर ती मीरेप्रमाणेच संत होऊ शकेल. साध्वी होऊ शकेल. कोणताही भक्त भक्तिभावाने प्रभूशी समरस झाला की देव त्याच्या ओंजळीने पाणी पिऊ लागतो, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. पण जीवनाला भक्तीचा रंग किती चढला यावरच हे अवलंबून असणार! भक्तीचा संबंध बाहेरच्या अवडंबराशी मुळीच नाही. तो मनाशी व हृदयाशी आहे. ज्या भक्ताचे हृदय भक्तीने भिजून गेलेले असते, ज्या भक्ताचे मन विकल्परहित झालेले असते तेव्हाच त्याच्यासमोर त्याची देवता नाचू लागत असते. प्रश्न असा आहे की ही वृत्ती निर्माण करण्याला काय करावे लागत असते? माझे मत असे आहे की संकटे किंवा संतसमागम या दोन गोष्टींमुळे ही गोष्ट शक्य होते. संतसमागमातून सद्बुद्धी मिळते. संकटांशी सामना करण्याने मनाची ताकद वाढते. पण संकटांशी सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावे लागते.संतसमागमासाठी हरिकथा घोकावी लागते. जग हे स्मशानवत समजून वैराग्य प्राप्त करावे लागते. सुख आणि संपत्ती या गोष्टींपासून बाजूला सरकावे लागते.मित्रा, शेवटी मन, बुद्धी व अहंकार ज्या मार्गाने जातात तसाच माणूस बनणार आणि तसाच त्याला अनुभव येणार. तुला दुसऱ्याची कथा आवडते पण प्रत्यक्ष काही करण्याची वेळ येईल तेव्हा मन घडीघडी कसे बदलत जाते याची साक्ष पटेल. यासाठी भक्तांनी व मीरेने काय काय आपत्ती सहन केल्या, हे काही नव्याने सांगण्यासारखे नाही. शेवटी जहराचा पेलासुद्धा तिच्या जवळच्या, घरातल्या लोकांनी दिला ना? हे सारे सहजपणे थोडेच घडते? ज्याप्रमाणे विषयांध माणूस जिवावर उदार होऊन लाज-शरम न बाळगता आपल्या प्रिय वस्तूला प्राप्त करून घेतो, त्याचप्रमाणे देवाशी जेव्हा प्रेम जडते तेव्हा काय होईल ते होवो पण आपल्या देवाशी अंतर पडू नये, असे भक्ताच्या मनाने घेतलेले असते. तो देवाच्या सख्यत्वासाठी वाटेल तसा प्रयत्न करून देवाची भक्ती करतो; व शेवटी देवस्वरूप होतो आणि मग देवाचे कार्य हेच आपले कार्य मानून देवाशी तादात्म्य पावतो असेच मीरेचे व अनेक भक्तांचे झाले आहे. येथे राणीच कशाला? कुब्जा, भिल्लीण, राधा, सखू, जनी, मंदोदरी सर्वांनी आपल्या जीवनाच्या पणत्या देवाजवळ पाजळल्या आणि जळलेल्या कापराप्रमाणे देवाशी समरस झाल्या. देवाच्या प्राप्तीसाठी स्वत:ला विलीन करून घेणे हीच प्रेमभक्तीची खूण आहे.                                                                                                                                                     -तुकड्यादास

  • बाबा मोहोड

 

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAdhyatmikआध्यात्मिक