शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चला पंढरीसी जाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 17:10 IST

महाराष्ट्रामध्ये सातशे वषार्पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धमार्ची पताका आज सुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेवून नाचत आहेत.

महाराष्ट्रामध्ये सातशे वषार्पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धमार्ची पताका आज सुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेवून नाचत आहेत. या पायी वारीची अखंड परंपरा संत नामदेव, संत तुकाराम व संत एकनाथ अशा अनेक संतांपासून तर लाखो वारकऱ्यांपर्यत सर्वांनीच अखंडपणे जोपासली आहे. विठ्ठलनामाचा गजर करित होणाºया वारीत सारेच सहभागी होऊन अध्यात्मिक समतेचा संदेश देतात.या रे या रे लहानथोर । याती भलत्या नारी नर।...अशा या भागवत धर्माच्या अध्यात्मिक परंपरेमध्ये संतानी आपले जीवन समर्पित केले आहे. एवढी मोठी भक्तीची परंपरा लाभलेल्या वैष्णवांच्या वारीच्या निमित्ताने आषाढी एकादशीला सर्व संताची मांदीयाळी पंढरीला अवतरते. आपल्या प्राणसख्या पांडूरंगाला पाहण्यासाठी व त्याला भेटण्यासाठी आपला जीव डोळ्यामध्ये साठवून पायी वारी करून ते पंढरीला येतात. मुखाने नाम गातात आपल्या देवाला मनामध्ये साठवून ते म्हणतात-टाळी वाजवावी । गुढी उभारावी।वाट ती चालावी पंढरीची।।सकळ मंगळ निधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी।।कोसो दूरून आलेले वारकरी आपला अवघा भाग व शीण त्या पांडूरंगाला पाहता क्षणीच विसरून गेलेले आहेत. त्यांना आता आपल्या संसाराची सुद्धा कोणतीही काळजी राहीलेली नाही. कोणत्याही प्रश्नाशिवाय पंढरीच्या रायाला भेटण्यासाठी ते येथे आलेले आहेत. संत तुकाराम महाराज तर म्हणतात-यारे नाचो अवघे जण । भावे आनंदे करून ।।गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊ संतजना ।।सुख फुकासाठी । साधे हरिनाम बोभाटी ।।प्रेम वाटीतो उदार । देतां नाहीं सान थोर ।।तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ।।संतांच्या या मांदीयाळी मध्ये एकमेकांना भेटतांना साक्षात विठ्ठल त्यांना आपल्या अंत:करणाशी लावतो आहे असे त्यांना वाटते. एक प्रकारची अध्यात्मिक लोकशाहीच पंढरीला अवतरते. हरिनाम ते अतिशय प्रेमाने गातात व सर्व संतांना क्षेम देतात. संतांच्या या प्रेमाला चंद्रभागेच्या तीरावर भक्तीची अपार भरती येते. ही महा पर्वणी ते आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना विठ्ठलच दिसतो अवघे विश्व विठ्ठलमय झाल्याचा भास त्यांना होतो. समत्ववाचा व विश्वरूप दर्शनाचा भाव त्यांचे ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांना ईश्वर आपल्यापेक्षा वेगळा वाटतच नाही.जेथे देखे तेथे तुझीच पाऊले। विठ्ठल अवघे कोंदाटले ।।रूप गुणनाम अवघा मेघश्याम । वेगळे काय ते काय उरले।।संत तुकारामांनी तर भक्तिसाधनेचा कळस गाठला. ही उच्चतम अवस्था त्यांना जी प्राप्त झाली त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा परमेश्वराविषयीचा उत्कट भाव आहे. भावानेच भक्तीला पूर्णता येते. देव हा भावाचा भुकेला आहे. ज्याचा जसा भाव असेल तसा त्याचा देव असतो म्हणून.जें जें भेटें भूत । ते ते मानिजे भगवंत ।असा संदेश ते सर्वांना देतात. वारीच्या माध्यमातून असा विश्वसखाभाव निर्माण होत असतो ती विश्वशांतीसाठी आवश्यक प्रार्थना आहे. वारीमुळे प्रत्येक वारकर्यांना एक समाधानाचा भाव प्राप्त होऊन ते आपल्या प्रेमसंख्या पांडुरंगाला क्षेम देतात.

- डॉ. हरिदास आखरे

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारी