शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:41 IST

सोलापूर : दैनंदिन जीवनात जगात ज्याच्याकडे पुष्कळ असते, त्याला आणखी मिळते आणि ज्याला खरोखरच गरज असते त्याला काहीच मिळत ...

ठळक मुद्देआचार्यांनी आपल्या उपदेशात भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या अतूट मैत्रीचा दाखला दिलामनुष्याकडे केवळ ज्ञान असून उपयोग नाही. त्या ज्ञानाचे रूपांतर त्यागात होणे अपेक्षित असते़ - किशोरजी व्यास

सोलापूर : दैनंदिन जीवनात जगात ज्याच्याकडे पुष्कळ असते, त्याला आणखी मिळते आणि ज्याला खरोखरच गरज असते त्याला काहीच मिळत नाही, परंतु अशावेळी ‘ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान’ ही जगद्गुुरू संत तुकाराम महाराजांची शिकवण महत्त्वाची ठरते, असेही आचार्य किशोरजी व्यास यांनी सांगितले.

मनुष्याकडे केवळ ज्ञान असून उपयोग नाही. त्या ज्ञानाचे रूपांतर त्यागात होणे अपेक्षित असते़ भगवान श्रीकृष्ण व मित्र सुदामा यांची मैत्री अतूट होती. यात सुदामाची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. त्या स्थितीतही तो समाधानी होता. तेच तत्त्व समाजात प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे. 

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे प. पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज उपाख्य आचार्य किशोरजी व्यास यांच्या भागवत कथेचे आयोजन पर्ल गार्डन येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सोमवारी कथामालेत त्यांनी द्वारकालीला, सुदामापूजन, भागवत धर्म, उद्धवोपदेश सांगून कथासमाप्ती केली.

आचार्यांनी आपल्या उपदेशात भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या अतूट मैत्रीचा दाखला दिला. सुदामाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. परंतु त्यांची वृत्ती समाधानी होती. महाभारतात असलेली सुदामाची ही वृत्ती केवळ एक प्रसंग नसून प्रतिकूल परिस्थितीतही मनुष्याने समाधानी राहावे, ही समस्त मनुष्यमात्राला दिलेली फार मोठी शिकवण असल्याचे स्पष्ट केले. या भागवत कथेत आचार्य किशोरजी व्यास यांनी दररोज श्री भागवत महात्म्य, श्री नारद - व्यास संवाद, सतीचरित्र, ध्रुवाख्यान, भरतचरित्र, नृसिंह अवतार, श्रीकृष्ण बाललीला, गोवर्धन पूजा, कंसवध, द्वारकालीला, सुदामा पूजन, उद्धवोपदेश आदींच्या माध्यमातून भागवत कथेचे निरुपण केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक