शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोग कर्मसंन्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 04:15 IST

कर्म आणि ते घडविणारा कर्ता यांचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला वर्ग म्हणजे क्रियाशून्य किंवा कर्मरहित, कर्मत्यागी होय. दुसरा वर्ग म्हणजे कर्ता होय. तिसरा वर्ग कर्मयोगी; तर चौथा ‘कर्मसंन्यासी' होय.

- डॉ. रामचंद्र देखणेकर्म आणि ते घडविणारा कर्ता यांचे चार प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला वर्ग म्हणजे क्रियाशून्य किंवा कर्मरहित, कर्मत्यागी होय. दुसरा वर्ग म्हणजे कर्ता होय. तिसरा वर्ग कर्मयोगी; तर चौथा ‘कर्मसंन्यासी' होय. व्यवहारात अशी माणसे आढळतात की, जी अद्वितीय कर्मे सोडाच, पण नित्याचे जीवन जगताना आपल्या वाट्याला आलेली विहित कर्मेही करीत नाहीत; पण कर्माच्या फळाची मात्र अपेक्षा धरतात. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' अशी त्यांची भूमिका असते.जीवनामध्ये जर कर्म पेरले तरच समृद्धीची फळे येतील. कर्म तर करायचे नाही आणि कर्मफळाची अपेक्षा तर धरायची- हा जो वर्ग आहे, तोच कर्मत्यागी किंवा क्रियाशून्य वर्ग होय. वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीची कोणतीही अपेक्षा अशा वर्गाकडून करणे चुकीचे ठरते, दुसरा वर्ग हा निष्ठेने कर्मही करतो आणि कर्माच्या फळाची आशाही धरतो. कर्तृत्वाचा- म्हणजे 'हे कार्य मी केले आहे' या भावनेचा त्याला अहंकारही असतो. याच वर्गाला 'कर्ता' म्हणतात. व्यवहारातील अनेक कर्मे अशा वर्गाकडून घडली जातात. तिसरा वर्ग म्हणजे 'कर्मयोगी' होय. तो नित्यकर्म करतो; परंतु कर्मफलाची आशा करीत नाही, तो निष्काम कर्मयोगी होय. इथे कर्माचे सातत्य असते; पण कर्मफलाची आशा नसते. तर चौथा वर्ग म्हणजे 'कर्मसंन्यासी', जो नित्य कर्मात रमतो, फळाची आशाही करीत नाही आणि या कर्माचा मीच कर्ता आहे; ही कर्तृत्वाची भावना म्हणजेच कर्तृत्वाचा अहंकारही मावळलेला असतो. नित्य-कर्म करूनही फलाशेमध्ये आणि कर्मबंधात न अडकणारा - तोच कर्मसंन्यासी होय. । ‘संन्यास: कर्मयोगश्च’या गीतेच्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली सांगतात - अर्जुना, सखोल विचार केला असता कर्मयोग आणि कर्मत्याग हे दोन्ही मोक्षदायकच आहेत. परंतु त्यातही कर्मयोग हा अधिक सोपा व सुलभ आहे. माऊली दृष्टांत देतात,‘‘तरी जाणां नेणा सकळां ।हा कर्मयोगु कीर प्रांजळा।जैसी नांव स्त्रिया-बाळा ।तोयतरणी ।।’’ ज्ञाने. ५११६पाण्यातून तरून जायचे आहे. ज्याला पोहता येते तो सहजपणे पैलतीरावर जाईल. पण ज्यांना पोहता येत नाही अशा स्त्रिया आणि बालकांना नावेचा आधार घेऊनच पैलतीरावर जावे लागते. त्याप्रमाणे कर्मयोग हा सर्वांना तरून जाण्याचे नावेसारखे, सोपे साधन आहे.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक