शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

कर्म हे निष्काम स्वरुपाचे असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 11:51 IST

आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे. जे निष्काम स्वरुपाचे असावे.

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार

कामे सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान ।।श्रीकृष्ण सिद्धे केले उचच्छिष्टे काढून । ओढिले ढोरे विठ्ठले ।।

केल्या जाणाऱ्या सर्व विकासोन्मुख कामांची योग्यता सामाजिकदृष्ट्या सारखीच असून, विकास कामात त्यांचा वाटा हा कमी किंवा जास्त नसतो, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकासाचे महत्त्व सांगताना नमूद करतात. कोणीही सर्व विद्या आत्मसात करीत नाही, परिस्थितीनुसार व श्रमपरत्वे माणूस कला अवगत करतो. जो तिन्ही जगाचा स्वामी, ब्रह्मांड रचेता, पांडवांचे सारथ्य करतो, ही देखील मानवी रुपात महानता आहे. 

एकदा का एखाद्या कार्यास स्वत:हून वाहून घेतले की, त्यात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली असावी. स्वत:च्या विकासासाठी आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी आपल्या वाट्याला आलेली कामे तन्मयतेने, सचोटीने व कार्यकुशलतेने करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे. कार्य ही परंपरा नसून, ध्येय असावे लागते. बहुतांश वेळेस कामे न करताच श्रेयवादात माणसे अडकतात आणि नामोहरम होतात. काम करीत राहणे व फळाची अपेक्षा करू नये, असे असताना देखील काम न करता फलप्राप्ती कशी होईल, ही प्रवृत्ती बळावत आहे. काम न करिता, दाम, नाम आणि पदाची अपेक्षा या विकृती बळावल्या आहेतच. प्रत्येक क्षेत्रात आत्मचिंतन होण्याची गरज असून, कर्म हीच पूजा आहे. यांचा विचार ठासून रुजविण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 

खरे नाम विष्काम ही ग्रामसेवा । झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा ।।कळो हे वळो देह कार्यी पडू दे । घडू दे प्रभो एवढे घडू दे ।।

कार्यसक्ती कशी असावी, याचे हे ज्वलंत भाष्य आहे. आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे. जे निष्काम स्वरुपाचे असावे. आपण जिथे वावरतो तिथे स्वर्गासम भास झाला पाहिजे, असे मागणे काय असावे तर मरावे परी कीर्तिरुपी उरावे, पण असे घडताना दिसते का, याचा फार विचार करण्याची गरज नाही. कारण निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे. व्यक्ती कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे. कर्म फळ, संबंध, नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, यालाच कर्मवादाचा सिद्धांत म्हणतात. 

संत मीराबाई, सूरदास, कबीर आदींनी कर्माची धारणा सुस्पष्ट करीत असताना ‘कर्म गती टारे नही टरै । जो जस करे, सो फल चाखा ।।' असे सांगितले आहेच. कर्माची व फळाची प्राप्ती एकाचवेळी शक्य नसते. अर्थात दोहोत खूप अंतर असते. कर्मावस्थेत कर्ता आणि फळास्थेत भोक्ता असे असेल तर कर्मावस्थेतील कर्त्यास त्याची फलप्राप्ती होत नाही. जर कर्म करणारा फलप्राप्ती वेळ बदलला तर फलप्राप्तीचा उपभोक्ता कोण, अशा परिस्थितीत दोन दोष निर्माण होण्याची शक्यता असते. एक क्रोतप्रणाश म्हणजे केलेले कर्म नष्ट होणे आणि दुसरे अक्रुताभ्यूगम म्हणजे अक्रत कर्माचे फळ यावरून असे स्पष्टपणे जाणवते की, कर्मफळ हे निश्चित प्राप्त होतेच. आजच्या कालावधीत कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठा आवश्यक झाल्या आहेत. ज्यांच्याकडे या गोष्टी आढळतात, त्यांच्या हातून मानवकल्याण होणे शक्य आहे. म्हणूनच प्रार्थना केली आहे की,‘तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाझी या योगे'

(लेखक हे लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भू-वैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक