शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग अंतरनिष्ठ तितुके तरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 03:28 IST

मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात.

स.भ. मोहनबुवा रामदासीआपल्या अंतरंगात असलेल्या परमेश्वरावर, अगाध निष्ठा असावी. निष्ठा हा प्रतिष्ठेचा विषय होऊ नये, निष्ठा नसेल तर कुठलाच व्यवहार चालत नाही. मुलांची वडिलांवर असलेली निष्ठा कमी झाली की घरात कलह सुरू होतो. भावाभावातलं प्रेम, निष्ठा कमी झाली की कोर्ट कचेऱ्या सुरू होतात. बेबनाव वाढतच जातो. खटके कायम वाढत जातात. याच्या मुळाशी पैसा, संपत्ती आणि गर्व हीच प्रमुख कारणे असतात. हा व्यावहारिक अंतरनिष्ठेचा फक्त एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार सांगता येतील, पण माझ्या दृष्टांताला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून मी व्यवहारातले दाखले थोडे कमी देत असतो. वरील वचनातून समर्थांना अंतरनिष्ठेबद्दल सांगायचे आहे. समर्थ म्हणतात, मूर्तिपूजेवर तुम्ही निष्ठा ठेवाल, पण चालत्या-बोलत्या माणसातला खरा आत्मरूपी (आत्माराम) ओळखण्यासाठी सगळे उपचार असतात. त्या आत्मारामावर निष्ठा, भाव, प्रेम, भक्ती असेल तरच साधक तरू शकेल. नाही तर बाह्याकारे भरंगळले लोकाचारे अशी अवस्था होईल. लोकाचार एकदा अंगात संचारला म्हणजे माणूस कावराबावरा होतो. लोकेशनासुद्धा मर्यादित असावी, अंतरंगात साधक जसजसा डोकवायला लागेल तसतसा त्याचा लोकाचार कमी होतो. समर्थांची लोकप्रियता खूपच होती, त्याचे यथोचित वर्णन केलेले आहे.लोकांस पायाचा आदर। तेथे याचा अनादर। लोकांना समर्थांना केव्हा एकदा पाहीन असे व्हायचे, पण समर्थ त्याबाबत उदासीन असायचे, म्हणून त्यावर एक युक्ती करायचे ती अशी,जातो स्थळ ते सांगेना। सांगितले तेथे जाईना। आपुले स्थिती अनुमाना। येवोच वेदी।खनाळा मध्ये जाऊन राहे। तेथे सर्वत्रांची चिंता वाहे।हे त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. म्हणून परमार्थामध्ये अंतरनिष्ठेला अत्यंत महत्त्व आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक