शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आनंद तरंग : पाचवी कला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:25 IST

परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते,

विजयराज बोधनकरनियोजनाने मोठमोठे चमत्कार घडले आहेत. नियोजनामुळे अनेक सामान्य माणसे आकाशाइतकी मोठी झाली आहेत. गोष्ट कुठलीही असो पक्के नियोजन असेल तर उत्तम यश पदरी पडते. मग नियोजन म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. नियोजनासाठी पूर्णपणे बुद्धीचा वापर करावा लागतो, बारीकसारीक गोष्टींचा विचार करूनच मांडणी करावी लागते. घरात लग्न असो, नव्या व्यवसायाची सुरुवात करायची असो, दूर कुठे तरी प्रवासाला जायचे असो, गावात उत्सव असो, सरकारी योजना असो, शैक्षणिक योजना असो, असे अनेक विषय असो, यात नेमके धोके कुठे आहेत, नेमकी कुठली बाजू महत्त्वाची आहे, याला येणारा खर्च किती, मनुष्यबळाची काय तयारी करावी लागणार, नियमांची उजळणी किती करावी लागणार, आर्थिक पाठबळ कसे उभे करता येईल, दिनक्रमात वेळेचा सदुपयोग कसा करून घेता येईल, अशा अनेक गोष्टींचे चिंतन मनन करून त्याची डायरीत नोंद करून त्यावर अंमलबजावणी करणे म्हणजे नियोजन होय.

परिवाराला सुखी आणि काळजीमुक्त ठेवण्यासाठी पक्के नियोजन खूप महत्त्वाचे ठरते, ही एक मोठी कला आहे. मोठमोठी मॅनेजमेंटची कॉलेजे याचे शिक्षण देतात, व्यक्तिमत्त्व विकासासाठी नियोजनाची कला खूप यश पदरात पाडून जाते, घरापासून ते देशाच्या कारभारापर्यंत नियोजनासाठी प्रत्येक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे, दिवसभराचे, आठवड्याचे, महिनाभराचे आणि वर्षभराचे नियोजन करणारी व्यक्ती कधीही सैरभर न होता ठरविल्या मार्गाने आपल्या स्वप्नांचा प्रवास करीत राहते आणि अपयशापासून स्वत:ला वाचवत असते. आध्यात्मिक मार्ग आणि नियोजनाचा मार्ग एकचआहे. ज्यामुळे बुद्धी स्थिर राहते आणि मन सकारात्मक विचार करण्यास सतत प्रवृत्त होत राहते. म्हणूनच नियोजनाला पाचवी कला आणि महत्त्वाची कला समजावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक