शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आनंद तरंग - जय जय गणराया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 06:37 IST

श्रीगजानना, तुम्ही ज्ञानमय आहात. तुम्ही ओम्कार आहात.

शैलजा शेवडे

जय देव जय देव जय जय गणराया, जय जय गणरायाद्यावी बुद्धी निर्मल, आम्हां तुम्हांस वर्णाया।मंगलमय, अतिसुंदर, गजमुख तव मूर्ती,सुखकारक, दु:खहारक, ऐसी जगी कीर्ती,प्रथम तुम्हां वंदुनी मग कार्या लागावे,सिद्धीस नेण्या, श्री समर्थ असतां, आम्ही का भ्यावे?जय देव जय देव जय जय गणराया, जय जय गणरायाद्यावी बुद्धी निर्मल, आम्हां तुम्हांस वर्णाया।नाभिशेषा नित्या, नरकुंजररूपा,हेरंबा, स्वानंदा, ओम्कारस्वरूपा,चरणी मन स्थिर व्हावे, लाभो अशी युक्ती,गणपती देवा द्यावी, अखंडिता भक्तीजय देव जय देव, जय जय गणराया, जय जय गणराया,द्यावी बुद्धी निर्मल, आम्हां, तुम्हांस वर्णाया।

श्रीगजानना, तुम्ही ज्ञानमय आहात. तुम्ही ओम्कार आहात. ओम हा केवळ अ, उ, म ने बनलेला नाही. अ म्हणजे उत्पत्ती. उ म्हणजे पालन, म म्हणजे विनाश. ही तीन अक्षरे सगुण ब्रह्माचे द्योतक आहेत. तर त्यावरील अर्धचंद्र रेखा ही सगुण, निर्गुण यामधील विभाजक सीमा आहे आणि त्यावरील बिंदू निर्गुण ब्रह्माचे द्योतक आहे. परत आपल्या मनात शंका येते, जर का ब्रह्म निर्गुण निराकार आहे, तर त्याला बिंदूचा आकार कशाला? तर भौमितिक भाषेत बिंदू. म्हणजे त्याला अस्तित्व तर आहे. पण लांबी, रुंदी, उंची नाही. आकारमान नाही. म्हणजे त्याला भौतिक साधनांनी मोजता येत नाही. उत्पत्ती, स्थिती, लय, सगुण निर्गुणाला विभागणारी रेखा, बिंदू स्वरूपात असणारे ब्रह्म. शिवाय नाद. सर्व मिळून ओम्कार आणि हे त्या गणेशाचे रूप! तत्त्वमसि... अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्त्व. तुम्हीच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्त्व. तुम्हीच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म. गणेशदेवा, तुम्हाला परतपरत वंदन..!

 

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपती