शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वैराग्यप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:53 IST

आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे.

- वामनराव देशपांडेदेहभावना नष्ट झाल्याशिवाय परमात्माप्राप्तीच्या साधनेला आवश्यक असणारी गती प्राप्तच होत नाही. दहाही इंद्रिये वासनाग्रस्त असतात. आपण कोणी तरी श्रेष्ठ पुरुष आहोत, हा अहंकार साधनेच्या आड येतो. तसेच जन्मापासून वृद्धत्वापर्यंत शरीर वेदना आणि दु:खांना सामोरे जावे लागते. सुखदु:खांनी लडबडलेले आयुष्यसुद्धा करीत असलेल्या नामसाधनेच्या सतत आड येत राहते. त्यासाठी काय उपाय करावे यावर भगवंत हितोपदेश करतात.इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहक्कार एव च।जन्ममृत्युजराव्याधिदु:दोषानुदर्शनम।।आपल्या भोगउत्सुक इंद्रियांवर बुद्धीच्या बळावर पूर्ण ताबा मिळवून, त्या इंद्रियांमध्ये वैराग्य निर्माण होणे साधकावस्थेत अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत इंद्रिये आपापल्या विषयसेवनांपासून अलिप्त होत नाहीत, तोपर्यंत वैराग्याची प्राप्ती होतच नाही. अहंकारी वृत्तीचा दंश साधकाला चुकूनही होता कामा नये. अहंकार साधनेला मारक ठरतो. तसेच जरा-व्याधींकडे लक्ष केंद्रित करणे साधनेला हितकारक होत नाही. म्हणून साधकाने व्याधींकडे वा वाढत जाणाऱ्या वयाकडे दुर्लक्ष करावे. हे जे दु:खरूप होणे, म्हणजे शारीर भाव मनात सळसळत राहणे असते ते करीत असलेल्या साधनेला निश्चितपणे हानी पोहोचवते हे निश्चित. सत्य म्हणजे नेमके काय? सत्य काय तर सुखाची प्राप्ती अविरत व्हावी ही तीव्र इच्छा मानवी दु:खाचे कारण आहे. एकदा का सुखाच्या अभावाने दु:ख निर्माण झाले की, विवेक संपुष्टातच येतो. सुख काय अथवा दु:ख काय, ही मनोनिर्मिती आहे. त्याचा आपण त्याग केला पाहिजे. भगवंत सतत अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच साधक भक्तांना मोलाचा संदेश देतात की,असक्तिरनभिष : पुत्रदारगृहादिषु।नित्ये च समचितत्वामिष्टानिष्टोपपत्तिषु ।।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक