शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मनाला शुभचिंतनाची सवय लावणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 08:17 IST

​​​​​​​आत्मग्लानी किंवा व्यर्थ विचार करणे या गोेष्टी मनाला दुर्बल बनवितात.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआत्मग्लानी किंवा व्यर्थ विचार करणे या गोेष्टी मनाला दुर्बल बनवितात. मनाला दुर्बल बनू न देता त्यावर संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. निकृष्ट भावना आणि विचार यांचा सामना करण्यासाठी मनाला प्रवृत्त करा. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्साहाने कार्य करीत राहिले पाहिजे. मनावर संयम ठेवला पाहिजे. जास्तीत जास्त चांगला विचार करा. मनाला शुभचिंतन करण्याची सवय लावायला हवी. तुम्ही मनाला जेवढे चांगले ठेवाल तेवढा तुमचा आध्यात्मिक विकास होत असतो. जर गायीला चांगला पौष्टिक आहार दिला तर ती अधिक दूध देते, तिच्या दुधामध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे मनाला चांगला आहार म्हणजे सद्विचारांचा आहार दिला तर मन प्रसन्न होईल. प्रसन्न मन शांतीला जन्म देते, त्या मनामध्ये कायम शांती वास करते. ध्यानधारणा, प्रार्थना, जप हा मनाला प्रसन्न ठेवण्याचा सात्त्विक आहार आहे. त्यामुळे मनाची स्थिती-गती यावर नियंत्रण ठेवता येते. याने मनावर करडी नजर ठेवता येते. त्याच्या गतिविधीचा विचार करता येतो. मनावर कंट्रोल ठेवला की मन स्वयंस्थिर होते आणि तुमच्या कार्याला चांगली गती मिळते. तुम्हाला श्वासावर चांगले नियंत्रण ठेवता येते. श्वासावर नियंत्रण केल्याने प्राणायाम साधला जातो. मनाच्या भावनेवरच प्राणायामची स्थिती अवलंबून असते. ती साध्य झाल्यास मन सजग बनते. सजग झालेले मन आपल्या श्वास- उच्छ्वासात बदल घडवून आणते.मग चित्तशुद्धीचा मार्ग मोकळा होतो.कारण चित्तशुद्धी आध्यात्मिक मार्गात असणाऱ्या माणसाला सर्वाेच्च स्थिती गाठून देते. चित्तशुद्धी झाल्याशिवाय आत्म्यामध्ये गोपाल निवास करीत नाही. चित्ताची अवस्था निरामय असावी लागते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ।येऊनी गोपाल राहे तिथे।।चित्त निर्मळ झाल्याशिवाय अध्यात्माचा मार्ग मोकळा होत नाही. चित्त स्थिर ठेवण्यात मनाचा मोठा वाटा असतो. नव्हे मनाचाच एक भाग चित्त आहे. म्हणून या मनाची परिस्थिती मनावरच अवलंबून आहे.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक