शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 03:13 IST

आईची हेळसांड ज्या घरात होत असते त्या घराला आई जिवंत असताना कळत नाही व गेल्यावर मिळत नाही, एवढं तरी कळायला हवं.

- बा.भो. शास्त्रीऋषी परमेश्वराची प्रार्थना करताना म्हणतात,‘त्वमेव माताच पिता त्वमेवत्वमेव बंधुश्च सखा त्वमेवत्वमेव विद्या द्रविणं त्वमेवत्वमेव सर्वां मम देव देव’या श्लोकात परमेश्वराला आधी आई म्हणतात. शेवटी देवाचा उल्लेख करतात. वेदांनी देवांचं देवत्व मान्य करूनही आईबद्दल आपलं मत व्यक्त करत असता, ‘न मातु:पर दैवतम्’ असं म्हटलं आहे. स्वामी आईची उंची सांगताना एका सूत्रात म्हणतात, ‘मातेचे स्नेह ते नैसर्गिक.’ येथे आईच्या स्नेहाचं वर्णन करताना तिला स्नेहाचा नैसर्गिक झरा म्हटलं आहे. असं खरं तर हे सूत्र आईचं एका ओळीचं मंगल स्तोत्रच आहे. स्वामी लौकिक अर्थाने मातृभक्त होते. ते जेव्हा शपथ घेतात तेव्हा आईचीच शपथ घेतात. शपथ ही अढळ प्रतिज्ञा असते. ‘मालुबाईची आण’ असं ते म्हणत माल्हणदेवी हे त्यांच्या आईचं नाव होतं. आई जन्म देणारीच असते असं नाही. स्वामींनी बोणेबाईला आई म्हटलं आहे. एवढंच नाही यशोदेसारखाच पुतनेलाही त्यांनी आईचा दर्जा दिला आहे. खरं तर तिने कृष्णाला विष पाजलं, पण स्तनातून पाजलं म्हणून आई म्हटलं. संत ज्ञानेश्वर महाराजांनाही सर्व वारकरी माउली म्हणतात. वात्सल्य असेल तर पुरुषालाही माता म्हणता येतं. त्यांनी ज्ञान पाजून बुद्धीचं पोषण केलं म्हणून माउली. आईची हेळसांड ज्या घरात होत असते त्या घराला आई जिवंत असताना कळत नाही व गेल्यावर मिळत नाही, एवढं तरी कळायला हवं. ती देवाची प्रतिनिधी आहे.तिलाच रामाने स्वर्गापेक्षा श्रेष्ठ म्हटलं आहे.‘अपि स्वर्णमयि लंका लक्ष्मणा मे न रोचतेजननी जन्मभूमिश्च स्वर्गिदपि गरियसि’तिच्या दुधाचे उपकार विसरण्यासारखे नाहीत. या सावलीला उन्हात ठेवणारी नादान मुलंही जन्माला येतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक