शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
3
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
4
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
5
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
6
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
7
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
8
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
9
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
10
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
11
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
12
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
13
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
14
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
15
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
16
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
17
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
18
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
19
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
20
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

मन:शक्ती मजबूत झाल्यास अनेक बदल शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:39 IST

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मनाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. आरोग्यप्राप्तीसाठी मनाची अवस्था सांभाळणे महत्त्वाचे आहे. मनावरच ध्यान, योग, आसन, प्राणायाम व नंतर योगाची प्राप्ती अवलंबून आहे. कारण मनानुसार भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक स्तरावरची प्रक्रिया ठरत असते. मनाची एक शक्ती आपल्या आतल्या-बाहेरच्या क्रिया करायला भाग पाडते. आपल्या श्वासोच्छ्वासावरही त्याचा परिणाम होतो. मनाला विश्रांती किंवा शिस्तबद्धपणा लावावयाचा असेल तर भावनेवर नियंत्रण ठेवता यावे. जर भावनेवर नियंत्रण ठेवता आले नाही तर आपल्या हातून काहीही कृत्य घडू शकते. शरीरातील पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्थेवरही त्याचा परिणाम होत असतो. मन वेगवेगळ्या स्थितीला जाऊन पोहोचते. तेव्हा त्याचा शरीरावर परिणाम होत असतोच! म्हणून आपण आपल्या शरीरावर व मनावर नियंत्रण आणू इच्छित असाल तर आध्यात्मिक मार्गाने जाणे सोयीचे ठरेल. आध्यात्मिक मार्गाने गेल्यास आपल्या आपण मनाला सुदृढ करू शकतो. आपल्यातला न्यूनगंड कमी करू शकतो. आत्मविश्वासाला बळकटी आणता येते. विश्वचैतन्याच्या लहरींशी एकत्र होता येते. मग आत्मस्फूर्ती निर्माण होते. हळूहळू क्रियात्मक बदल घडू लागतात. वेगवेगळ्या स्थितीमध्ये शरीरात व मनात परिवर्तन होते. त्याच्या प्रत्येक कृतीत लय व चैतन्य असते. त्यामुळे जीवनात सतर्कता येते, एक नवीन दृष्टी मिळते. चैतन्याकडे लक्ष केंद्रित होते. यासाठीच मनावर नियंत्रण मिळवले पाहिजे. कारण त्यामुळे स्वास्थपूर्ण जीवन जगता येते. मानसिक आरोग्य स्थिर राहाते. जीवनशैली बदलते. तुमचे जीवन सुखी व आनंदी राहाते. रोगप्रतिकारक शक्ती मनावरच अवलंबून असते. मन:शक्ती मजबूत असली की स्वत:मध्ये अनेक बदल घडवू शकतो. मनातील वाईट विचारांचा नाश करून मनाला चांगल्या विचारांची सवय लागते. त्यामुळे माणसांनी अध्यात्माचा आश्रय घ्यावा. अध्यात्माशिवाय आत्मिक उन्नती नाही. आत्मिक उन्नतीशिवाय जीवन सुखी बनू शकत नाही. त्यामुळे अध्यात्माशी एकरूप होऊन मनावर नियंत्रण मिळवा व सुखी संसाराचा मार्ग अवलंबावा.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक