शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सगुणाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:43 IST

- प्रा. शिवाजीराव भुकेले संत चळवळीला हे पूर्णपणे ठाऊक आहे की, निर्गुणाला धक्का न लावता सगुणाची यथार्थ ओळख करून घेता ...

- प्रा. शिवाजीराव भुकेले

संत चळवळीला हे पूर्णपणे ठाऊक आहे की, निर्गुणाला धक्का न लावता सगुणाची यथार्थ ओळख करून घेता येते. अर्थात सगुणा-निर्गुणातील भावनेचे प्रामाणिक प्रकटीकरणही महाराष्ट्रातील संत चळवळीची संपूर्ण देशाला मिळालेली खरी आध्यात्मिक देणगी आहे, असे आज आधुनिक बुद्धिवंतही मानू लागले आहेत. समाजाची जडत्वाची अवस्था नष्ट होऊन त्यात एक चैतन्य संचारले पाहिजे. त्यासाठी संतांनी त्याला नावारूपाला आणले. एवढेच नव्हेतर त्याच्या सगुण रूपाच्या भोवती आपल्या प्रतिभेचे असे आंगडे-टोपरे शिवले आहे की, कधी तो माझे आघडे-बघडे-छकुडे वाटू लागतो, तर कधी पंढरीनिवासा सखा वाटू लागतो. कधी-कधी संत विठाई-किताई कृष्णाई, कान्हाई या अर्थभावनेने त्याला साद घालू लागतात. जनाबाईला तर तो आपले आईवडील, बंधू आणि सर्वांत जवळचा मित्र वाटतो. संतांच्या या प्रयत्नांमुळे भक्तीच्या मर्यादित क्षेत्रात का असेना, एक आत्मजाणीवेची पहाट निर्माण झाली. परमेश्वराच्या सगुण-निर्गुणातीत भक्तिभावनेला महत्त्व देणारे भक्तांचे शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात,।। मलया निळ शीत निळू, पालवी नये गाळूसुमनाचा परिमळू गुंफिता नयेपैसा झाला सर्वेश्वरू, म्हणू नये साना थोरूत्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे।।मलयेगिरीवरून वाहणाऱ्या सुगंधी वाºयाला कधी गाळून घेता येत नाही. फुले गुंफून त्याची सुंदर माळ तयार करता येईल; पण फुलांचा सुगंध गुंफता येत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही आणि गगनाला गवसणी घालता येत नाही, तशीच आहे परमेश्वरी शक्ती.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक