शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भजन

By admin | Updated: September 10, 2016 12:46 IST

जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही

डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा ‘‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण । काय थोरपण जाळावे ते ।।’’जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत स्पष्टपणे सांगतात की, मानव जीवनामध्ये भजन हेच सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. जीवनामध्ये जे काही थोरपण आह ते मुळीच उपयोगाचे नाही. कारण ईश्वराने हा उत्कृष्ट असा मानव देह भजनासाठीच दिलेला आहे. ‘देवे दिला देह भजना गोमटा ।।’ मानवालादेवाने सर्वोकृष्ट अशी वाणी दिलेली आहे. मानवाची वाणी विचार प्रधान तर आहेच त्याबरोबर या वाणीने भावही प्रगट करता येतो. भगवंताला जोडण्याचे सहज साधन हे वाणीच आहे. ‘‘पवित्र तो देह वाणी पुष्यवंत । जो वदे अच्च्युत सर्वकाळ ।।’’ ‘‘भावे गावे गीत । शुध्द करुनिया चित्त ।। तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ।।’’ ईवरप्राप्तीचे सुलभ साधन असेल तर ते भजनच आहे. वारकरी संप्रदायाचे सर्वच वाड्मय गेय स्वरुपात निर्माण केलेले आहे. गायनामध्ये मनुष्य सहज रंगला जातो, रममाण होतो आणि त्याचे चित्त भगवंताशी एकाग्र होते. म्हणूनच सर्व संतांच्या रचना काव्य स्वरुपात आहेत आणि त्या गेय आहेत. संत तुकोबाराय म्हणतात ‘‘ गायनाचे रंगी । शक्ति अभ्दूत हे अंगी ।।’’ गायनामध्ये अभ्द्त शक्ती आहे याचाच अर्थ गायनाद्वारे सहज भगभ्दाव प्रकट होतो तसेच गेय वाड्मय पाठांतरासाठी सुलभ बनते. संत वाड्मय हे मंत्रग्रंथ आहेत, म्हणून त्याचे पारायण व पाठांतर आवश्यक आहे. काव्याचे पारायणही सोपे जाते आणि या भजनाद्वारे हरिनाम साधना घडते. कुठल्याही ग्रंथाचे पारायण करणे किंवा साग्रसंगीत भजन करणे हे नामचिंतनच आहे. कारण सर्व ग्रंथ अंतिमरित्या आपणास त्या परमेश्वराच्या नामालाच जोडू इच्छितात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘‘देखैं मनुष्य जात सकळ । हे स्वभावता भजनशील । पार्था जालेचि असे केवळ । माझा ठाई ।।’’ यामध्ये मानवाला त्याच्या मूळ स्वभावाची आठवण करुन दिली आहे आणि सूचित केले आहे की, मानवी जीवनाची मांडणी भगवभ्दजनावरच आहे.